घरदेश-विदेशCorona: वैद्यकीय सेवेसाठी 'उडान' विमानांची २ लाख किलोमीटर भरारी!

Corona: वैद्यकीय सेवेसाठी ‘उडान’ विमानांची २ लाख किलोमीटर भरारी!

Subscribe

लाईफलाईन उडानच्या विमानांनी ३७७.५० टन मालवाहतूक केली असून २ लाख ५ हजार ७०९ किलोमीटरहून अधिक हवाई अंतर केले पार

कोरोना व्हायरसविरुद्ध भारताच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी देशातील दुर्गम भागात आवश्यक वैद्यकीय मालवाहतूक करताना नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या २१८ पेक्षा जास्त लाइफलाईन उडान विमानांनी उड्डाण केले आहे. यासंदर्भातील ट्विट नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले आहे. आजपर्यंत लाईफलाईन उडानच्या विमानांनी ३७७.५० टन मालवाहतूक केली असून २ लाख ५ हजार ७०९ किलोमीटरहून अधिक हवाई अंतर पार केले. यापैकी १३२ उड्डाणे एअर इंडिया आणि अलायन्स एअरने चालविली आहेत.

नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि विमान उद्योग अत्यंत कार्यक्षम आणि किफायतशीर मार्गाने भारताबाहेर आणि परदेशात वैद्यकीय साहित्याची वाहतूक करून कोविड-19 विरुद्धच्या भारताच्या लढ्यास पाठिंबा देण्यास कटिबद्ध आहे. ईशान्य प्रदेश, बेट प्रदेश आणि डोंगराळ राज्य यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तसेच, एअर इंडिया आणि आयएएफने प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, लडाख, ईशान्य आणि इतर बेट प्रांतासाठी मदत केली आहे.

- Advertisement -

शासनासाठी विनाशुल्क वैद्यकीय पुरवठा

देशांतर्गत हवाई वाहतूक कंपनी स्पाईस जेट, ब्लू डार्ट आणि इंडिगो व्यावसायिक आधारावर मालवाहू उड्डाणे चालवित आहेत. स्पाइस जेटने २४ मार्च ते १२ एप्रिल २०२० या कालावधीत ३०० मालवाहू उड्डाणे चालविली असून ४ लाख २६ हजार ५३३ किमी अंतर कापत २४७८ टन मालाची वाहतूक केली आहे. यापैकी ९५ उड्डाणे आंतरराष्ट्रीय मालवाहतूक उड्डाणे होती. ब्लू डार्टने २५ मार्च ते १२ एप्रिल २०२० या कालावधीत ९४ देशांतर्गत मालवाहू उड्डाणे चालविली ज्यामध्ये, ९२ हजार ७५ किमी अंतर पार केले असून १४७९ टन मालवाहतूक केली आहे. इंडिगोने ३ ते १२ एप्रिल २०२० या कालावधीत २५ मालवाहू विमानांद्वारे २१ हजार ९०६ किमी पर्यंतचे अंतर पार करून २१,७७ टन मालवाहतूक केली. यात शासनासाठी विनाशुल्क वैद्यकीय पुरवठ्याचा देखील समावेश आहे.


कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी आता मेडिकल स्टोअर्सची मदत!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -