घरदेश-विदेश५७ वर्षापूर्वी चोरीला गेलेली बुध्दांची मूर्ती भारताला परत मिळाली

५७ वर्षापूर्वी चोरीला गेलेली बुध्दांची मूर्ती भारताला परत मिळाली

Subscribe

५७ वर्षापूर्वी चोरीला गेलेली बुध्दांची मूर्ती भारताला परत मिळाली आहे. १९६१ साली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या बिहार नालंदा येथील संग्रहालयातून बुध्दांची ब्राँझची मूर्ती चोरीला गेली होती. स्वातंत्र्यदिनाचे औचित्यसाधत लंडन पोलिसांनी इंग्लंडमधील भारतीय उच्चायुक्त वाय.के.सिन्हा यांना ही बुद्ध मूर्ती सुपूर्द केली.

स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने ब्रिटीशांनी ब्रिटीशांनी १२ व्या शतकात चोरीला गेलेली ब्राँझची बुध्दांची मूर्ती भारताला परत केली आहे. लंडनच्या मेट्रोपोलिटन पोलिसांनी आज समारंभपूर्वक ही मूर्ती भारताला परत केली आहे. आज भारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिवस आहे त्याचे औचित्य साधत लंडन इंडिया हाऊस येथे लंडन पोलिसांनी इंग्लंडमधील भारतीय उच्चायुक्त वाय.के.सिन्हा यांना ही बुद्ध मूर्ती सुपूर्द केली.

- Advertisement -

नालंदा संग्रहालयातून मूर्ती चोरीला गेली होती

१९६१ साली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या बिहार नालंदा येथील संग्रहालयातून बुध्दांची ब्राँझची मूर्ती चोरीला गेली होती. त्यावेळी नालंदा संग्रहालयातून १४ मूर्ती चोरीला गेल्या होत्या. चोरीला गेलेली बुध्दांची मूर्ती लंडनमध्ये लिलावात पोहचली होती. ही मूर्ती विकत घेणाऱ्या मालकाला ती चोरीची असल्याची माहिती लंडन पोलिसांनी दिले. त्यानंतर त्यांनी ती भारताला परत देण्याची तयारी दर्शवली.

लंडन पोलिसांच्या सहकार्याने मूर्ती परत मिळाली

पुरातन मूर्ती चोरी विरोधात काम करणारी संस्था एआरसीए आणि इंडिया प्राईड प्रोजेक्टचे विजय कुमार यांनी यावर्षी मार्च महिन्यात व्यापार मेळयात मूर्तीची ओळख पटवून दिली. त्यानंतर त्यांनी या मूर्तीसंदर्भात पोलिसांना सतर्क केले. त्यानंतर लंडन पोलिसांनी ही मूर्ती विकत घेतलेल्या मालकाला मूर्तीच्या चोरीबाबत कल्पना दिली. त्यानुसार त्यांनी ती मूर्ती भारताला परत देण्याचे सहकार्य दाखवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -