घरट्रेंडिंगमतदार ओळखपत्र हरवलंय? असं तयार करता येणार डुप्लिकेट Voter ID

मतदार ओळखपत्र हरवलंय? असं तयार करता येणार डुप्लिकेट Voter ID

Subscribe

सरकारमान्य ओळखपत्र म्हणून मतदार ओळखपत्र ओळखले जाते. सरकारकडून नागरिकांना देण्यात येणारे हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज मानले जाते. इतकेच नाही तर ते प्रादेशिक, राष्ट्रीय स्तरावर निवडणुकांमध्ये मतदान करण्याची परवानगी नागरिकांना देते. १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत मतदार ओळखपत्र अत्यंत महत्वाचे मानले जाते. मात्र हे कार्ड हरवले असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही डुप्लिकेट कार्डसाठी अर्ज करू शकता. जाणून घ्या त्याची प्रक्रिया

असा करा डुप्लिकेट ओळखपत्रासाठी अर्ज

डिजिटलायझेनच्या युगात डुप्लिकेट मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करणे अत्यंत सोयीचे झाले आहे. यासाठी तुम्ही खालील प्रक्रियेचा वापर करून अर्ज करू शकता. पंरतु हे डुप्लिकेट मतदार ओळखपत्र तु्म्हाला तुमच्या ओळखपत्राची चोरी झाली असेल, ते हरवलं असेल, किंवा ते ओळखपत्र फाटलं असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला मतदार ओळखपत्राची डुप्लिकेट प्रत मिळू शकते. भारतीय निवडणूक आयोगाने आता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डुप्लिकेट मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. याद्वारे, तुम्ही घर बसल्या डुप्लिकेट मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता.

  1. सर्वप्रथम फॉर्म EPIC-002 ची प्रत डाउनलोड करा. डुप्लिकेट मतदार ओळखपत्र बनवण्याचा हा फॉर्म मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या वेबसाईटद्वारे दिला जातो.
  2. हा फॉर्म योग्यरित्या भरून झाल्यानंतर सर्व कागदपत्रे जोडा. यामध्ये एफआयआर प्रत, पत्ता पुरावा आणि ओळख पुरावा देखील देणं आवश्यक असणार आहे.
  3. यानंतर हा फॉर्म आपल्या स्थानिक निवडणूक कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला एक रेफरेन्स नंबर देण्यात येईल
  4. हा फॉर्म सबमिट केल्यानंतर निवडणूक कार्यालयाद्वारे त्याची पडताळणी केली जाईल पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सूचित करण्यात येईल.
  5. त्यानंतर तुम्हाला निवडणूक कार्यालयात जावे लागेल आणि तुम्हाला डुप्लिकेट मतदार ओळखपत्र मिळू शकेल.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -