घरमहाराष्ट्रत्यांच्यात हिंमत नाही म्हणून पक्ष सोडून केंद्रीय मंत्री झाले; नवाब मलिकांचा राणेंवर...

त्यांच्यात हिंमत नाही म्हणून पक्ष सोडून केंद्रीय मंत्री झाले; नवाब मलिकांचा राणेंवर हल्लाबोल

Subscribe

अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आमच्यात हिंमत आहे म्हणून लढलो. तुमच्यात हिंमत नाही म्हणून पक्ष सोडून केंद्रीय मंत्री झाले, असा घणाघात नवाब मलिक यांनी केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना राणेंवर निशाणा साधला.

राज्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. यावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देताना राणेंना लक्ष्य केलं. भाजप यंत्रणेचा दुरुपयोग करत आहे. हिंमत आमच्यात आहे. ज्या नेत्यांमध्ये हिंमत नव्हती ते स्वत:चा पक्ष सोडतात आणि भाजपमध्ये जाऊन मंत्री होत आहेत, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला. आमच्यात हिंमत आहे, ज्यांच्यात हिंमत नाही ते भाजपमध्ये जात आहेत हे देश पाहत आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं.

- Advertisement -

नोटीस येणार हे अपेक्षितच होतं

नोटीस येणार हे अपेक्षित होतं, असं नवाब मलिक म्हणाले. नारायण राणे यांना अटक झाली. अटक झाल्यानंतर हे अपेक्षित होतं की अनिल परब यांना ईडीच्या माध्यमातून त्रास देण्यात येईल. आधिपासून भाजपचे नेते सांगत होते. कायदेशीर लढा आम्ही लढू. सूडबुद्धीने हे सगळं राजकारण सुरु आहे. याबाबत शंका नाही तर लोकांना विश्वास बसू लागला आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग होत आहे असं म्हटलं. एकदा एखादा विषय नोंद करुन घ्यायचा, वर्षोनुवर्षे चे चालवत रहायचं राजकीय दबाव आणायचा, त्यांच्यावर राजकीय दबाव आणायचा हे लपून राहिलेलं नाही. त्यांना जे करायचं ते करु द्या, ज्यांनी कोणी काही केलं नाही ते घाबरणार नाही. कायदेशीर मार्गाने कारवाई समोर जाणार, असं नवाब मलिक म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -