घरताज्या घडामोडीवर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस महागला; १९ रूपये दरवाढ!

वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस महागला; १९ रूपये दरवाढ!

Subscribe

गॅस सिलिंडर साठी आता ७१४ रुपये मोजावे लागणार आहेत. सलग पाचव्या महिन्यात सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे.

आजपासून नव्या वर्षाला सुरूवात झाली आहे. पण वर्षाची सुरूवातच महागाईच्या बातमीने होत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज गॅस सिलिंडरच्या दरात १९ रुपयांची वाढ केली आहे. त्यानुसार गॅस सिलिंडर साठी आता ७१४ रुपये मोजावे लागणार आहेत. सलग पाचव्या महिन्यात सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे.

मे-जून पासूनच सिलिंडरचे दर वाढत आहेत. घरगुती गॅस सिलिंडर बरोबरच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे. चीन आणि अमेरिका यांमधील व्यापारी संघर्षाचा परिणाम जागतिक कमोडीटी बाजारावर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किंमतीत वाढ होत असल्याने पेट्रोलियम कंपन्या एलपीजीच्या किंमतींचा आढावा घेत आहेत.

- Advertisement -

एलपीजीच्या विक्रीत वाढ

प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी १२ सिलिंडरवर अनुदान दिलं जातं. पण त्यानंतरचा प्रत्येक सिलिंडरची बाजारभावाप्रमाणे खरेदी करावी लागते. स्वच्छ इंधनाच्या वापराला केंद्र सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे मागील वर्षभरात एलपीजीच्या विक्रीत ६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

हेही वाचा – जम्मू-काश्मीरमधील एसएमएस, इंटरनेट सेवा सुरू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -