घरदेश-विदेश'लॉकडाऊन' दरम्यान LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत घसरण; सामान्यांना दिलासा

‘लॉकडाऊन’ दरम्यान LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत घसरण; सामान्यांना दिलासा

Subscribe

घरगुती ग‌ॅसच्या किंमतीमध्ये कपात करण्यात आली असून नवे दर १ एप्रिलपासून लागू

कोरोनाने देशात थैमान घातले असताना हा व्हायरस आपले हात पाय देशभरासह राज्या-राज्यात देखील पसरण्यास सुरूवात केले आहे. कोरोनाचे वाढणारे संक्रमण बघता सर्वत्रच भितीचे वातावरण बघायला मिळत आहे. अशातच एक चांगली बातमी समोर आली आहे. लॉकडाऊन दरम्यान भले पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचे चिन्ह दिसत नसले तरी स्वयंपाक घरातील LPG गॅस सिलेंडरच्या दरात घसरण झाली आहे. पंतप्रधान मोदींनी १४ एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन असल्याची घोषणा केली असल्याने लोकं घराबाहेर न पडता आपल्या घरात सुरक्षित राहून प्रतिसाद देत आहेत. दरम्यान कंपन्यांनी LPG गॅसच्या किंमतीत घसरण करून नागरिकांना दिलासा दिला आहे.

घरगुती आणि कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर कमी झाले आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांसाठी खूशखबर आहे. तेल मार्केटिंग कंपन्यांनी सबसिडी नसणाऱ्या एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. १४.२ किलोचे सबसिडी नसणाऱ्या एएनपीजी सिलेंडरच्या किंमती मुंबईमध्ये ६२ रुपयांनी घट होत ७१४ रुपये झाली आहे.

- Advertisement -

IOC च्या वेबसाइटवर दिलेल्या किंमतींप्रमाणे १४. २ किलोचे सबसिडी नसणाऱ्या एएनपीजी सिलेंडरच्या किंमती मुंबईमध्ये ६२ रुपयांनी कमी होत ७१४ रुपयांवर तर १९ किलो घरगुती सिलेंडरची मुंबईतील किंमत १२३४.५० रुपये झाली आहे.

- Advertisement -

अशी असेल मेट्रो शहरातील गॅसची किंमत

दिल्ली: १४.२ किलो- ७४४.५० रु.
१९ किलो- १२८५.५० रु.

कोलकाता: १४.२ किलो- ७७४.५० रु.
१९ किलो- १३४८.५० रु.

चेन्नई: १४.२ किलो-७६१.५० रु.
१९ किलो- १४०२ रु.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -