घरताज्या घडामोडीलसीकरण टार्गेटमध्ये १ दिवसाच्या उशिरासाठीही फासावर लटकवणार; जिल्ह्याधिकाऱ्यांनीच दिली धमकी

लसीकरण टार्गेटमध्ये १ दिवसाच्या उशिरासाठीही फासावर लटकवणार; जिल्ह्याधिकाऱ्यांनीच दिली धमकी

Subscribe

देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची दहशत पसरली आहे. त्यामुळे सातत्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालय सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून लसीकरणावर अधिक भर देण्यासाठी सांगत आहे. देशात काल, मंगळवारी लसीकरणाचा आकडा १३४ कोटी पार गेला. काल सायंकाळी ७ वाजेपर्यंत ६२ लाखांहून अधिक लसीचे डोस देण्यात आले होते. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात सर्वत्र लसीकरण मोहीम वेगाने सुरू केली गेली आहे. यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना टार्गेट करत असल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये लसीकरणाचे टार्गेट पूर्ण न झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी समोर आली आहे. लसीकरणाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट कर्मचाऱ्यांना फासावर लटकवणार असल्याची धमकी दिली आहे.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांनी मंगळवारी डबरा तहसीलच्या भितरवारमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यादरम्यान त्यांना १८ हजार लोकांचे लसीकरण पूर्ण होण्याचे लक्ष्य झाले नसल्याचे समजले. यामुळे जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह नाराज झाले.

- Advertisement -

या बैठकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर राग काढला. जर कोरोना लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करण्यात १ दिवस पण उशीरा झाला तर तुम्हा लोकांना फासावर लटकवणे, अशी थेट धमकी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिली. लसीकरणाचे हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही काहीही करा. शेतात जाऊ लस द्या, घराघरात जाऊ लस द्या, कोणी घेत नसेल तर घरात बसून राहा, हात जोडून प्रार्थना करा, पाया पडा. पण एकही डोस कमी पडला नाही पाहिजे. या बैठकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


हेही वाचा – Omicron Variant: ओमिक्रॉन विरोधात भारतातील लस प्रभावी नाही, Task Force चे चिंता वाढवणारे वक्तव्य


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -