घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update : राज्यात मागील २४ तासात ३१८ कोरोनाबाधितांची नोंद,...

Maharashtra Corona Update : राज्यात मागील २४ तासात ३१८ कोरोनाबाधितांची नोंद, मृत्यू संख्या घटली

Subscribe

राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील आज वाढली असून मागील २४ तासात ३५५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यातील दरदिवशी आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संस्थेत चढ उतार होताना दिसत आहे. राज्यात आज, शुक्रवारी ११ मार्च रोजी ३१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या घटली आहे. तर राज्यातील मृत्यूसंख्या देखील घटल्याचे पाहायला मिळाले. काल, गुरुवारी राज्यात ४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर आज केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्याचा राज्यातील मृत्यूदर हा १.८२ टक्के एवढा आहे.

त्याचप्रमाणे राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील आज वाढली असून मागील २४ तासात ३५५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत ७७ हजार, १९ हजार ९४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच सध्याचा रिकव्हरी रेट हा ९८.०९ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

राज्यात सध्या १८ हजार ६३३ व्यक्ती या होम क्वारंटाइन असून ५६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. तर राज्यातील सध्याच्या अँक्टिव्ह रुग्णांची संख्या पाहता ही २ हजार ९२५ इतकी आहे. तर राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील कमी झाली असून मागील काही दिवसांपासून ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आलेली नाही.

राज्यातील जिल्हा निहाय एँक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे –

- Advertisement -
.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळेझालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई १०५६२६७ १०३६३३२ १६६९२ २८६२ ३८१
ठाणे ७६६४०० ७५४२५३ ११८६८ ३५ २४४
पालघर १६३४३९ १६०००१ ३३९२ १५ ३१
रायगड २४४२२२ २३९२१३ ४९३६ ६६
रत्नागिरी ८४३९४ ८१८४१ २५४१
सिंधुदुर्ग ५७१४३ ५५५७७ १५११ १५ ४०
पुणे १४५१७०२ १४२९९१८ २०१५९ ३५० १२७५
सातारा २७८१२६ २७१३७४ ६६७७ ३४ ४१
सांगली २२६९९६ २२१३१२ ५६५५ २०
१० कोल्हापूर २२०४३५ २१४४९४ ५८९९ ३७
११ सोलापूर २२७००० २२१०७५ ५७५९ ११७ ४९
१२ नाशिक ४७२७२८ ४६३६७५ ८९०४ १४८
१३ अहमदनगर ३७७२०८ ३६९७६६ ७२२९ ११ २०२
१४ जळगाव १४९४७८ १४६७०९ २७२८ ३३
१५ नंदूरबार ४६६०६ ४५६३३ ९५९ ११
१६ धुळे ५०६८५ ५००१० ६५९ ११
१७ औरंगाबाद १७६३४३ १७२०१० ४२७० १४ ४९
१८ जालना ६६३०७ ६५०८१ १२२३
१९ बीड १०९०९१ १०६१९२ २८७४ १८
२० लातूर १०४९०३ १०२४०२ २४८३ १२
२१ परभणी ५८५२१ ५७२३७ १२५६ २०
२२ हिंगोली २२१६५ २१६५० ५१३
२३ नांदेड १०२६४२ ९९९२४ २६९७ १४
२४ उस्मानाबाद ७५११९ ७२९६० २०२३ ११६ २०
२५ अमरावती १०५९१९ १०४२८५ १६२२ १०
२६ अकोला ६६१६० ६४६६७ १४६५ २४
२७ वाशिम ४५६१० ४४९५४ ६३८ १५
२८ बुलढाणा ९१८५६ ९०९८७ ८२१ ४२
२९ यवतमाळ ८१९७८ ८०१५३ १८१६
३० नागपूर ५७६२८९ ५६६९७८ ९१४३ ७१ ९७
३१ वर्धा ६५६६० ६४२४७ १२३७ १७१
३२ भंडारा ६७९३२ ६६७८० ११३२ १० १०
३३ गोंदिया ४५३९८ ४४८११ ५८०
३४ चंद्रपूर ९८८०९ ९७२०६ १५८७ १२
३५ गडचिरोली ३६९५२ ३६२११ ६९१ ३४ १६
इतरराज्ये/ देश १४४ ३१ १११
एकूण ७८७०६२७ ७७१९९४९ १४३७५० ४००३ २९२५

 


हेही वाचा – Coronavirus Cases Today : देशातील कोरोना मृतांची संख्या वाढली; 4194 नवे रुग्ण, 255 मृत्यू

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -