Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: कोयना महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर वाढला

Live Update: कोयना महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर वाढला

Related Story

- Advertisement -

कोयना महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर वाढला, कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पूरस्तथिती निर्माण होण्याची शक्यता आहे.


राज्यात गेल्या २४ तासात ३ हजार ६२३ कोरोनाबाधितांची नोंद, २९७२ रुग्णांची कोरोनावर मात

- Advertisement -


चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव द्या, शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची मागणी

- Advertisement -

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे. चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबर २०२१ रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. लोकार्पणाच्या पुर्वीच नामकरणावरुन वाद सुरु होण्याची शक्यता आहे.


भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री, भाजपच्या बैठकीत मोठा निर्णय

भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्री पदी नियुक्ती का? ( सविस्तर वाचा )

कोण आहेत भूपेंद्र पटेल ज्यांना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडले (सविस्तर वाचा )


बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले आहे. येत्या 24 तासात ते आणखी तीव्र होण्याची शक्यता ( सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा )


ठाण्यात २५ विसर्जन स्थळी १,१९२ नागरिकांची अँटीजन चाचणी; एक पॉझिटिव्ह

ठाणे शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची अँन्टीजन चाचणी करण्याची व्यवस्था ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आली असून शनिवारी २५ ठिकाणी दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी आलेल्या १ हजार १९२ भाविकांची अँटीजन चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये फक्त एकाच व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आली असून यापुढेही भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी सर्व केले आहे.


उल्हासनगर- अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नराधमाला तीन दिवसांची पोलीस कोठडी

उल्हासनगर स्टेशनपरिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपीला कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.


ठाण्याच्या राबोडीत रविवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास खत्री अपार्टमेंटमधील सी विंग या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून स्लॅब कोसळून तो थेट तळ मजल्यावर आला.


पुण्यात ट्रेनिंगसाठी गेलेले १० पोलीस कर्मचारी पॉझिटीव्ह

पुणे येथे ट्रेनिंग साठी गेलेल्या १० पोलीस कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आल्याने नागपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ३० ऑगस्टला नागपूर पोलीस दलातील सर्व ३१ पोलीस स्टेशन मधील गुप्त वार्ता विभागातील प्रत्येकी एक पोलीस कर्मचारी व विशेष शाखेतील २ असे एकूण ३३ पोलीस कर्मचारी पुणे येथील महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी येथे १० दिवसांच्या ट्रेनिंगसाठी गेले होते. ट्रेनिंग झाल्यानंतर नागपुरात परत आल्यावर एका पोलीस कर्मचाऱ्याला ताप व खोकला सारखी सौम्य लक्षणे जाणवल्याने पोलीस रुग्णालयातही डॉक्टरांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना टेस्ट करण्याची सूचना दिली. कोरोना टेस्ट शनिवारी पॉझिटीव्ह आल्याने पुण्याला गेलेल्या ३३ पैकी २० पोलिसांची टेस्ट करण्यात आली. ज्यामध्ये १० कर्मचारी पॉजिटीव्ह आले आहेत.


भारतात गेल्या २४ तासात २८ हजार ५९१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३३८ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहे. कालच्या दिवसात देशात ३४ हजार ८४८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.


परभणीत मॉर्निंग वॉकला गेलेल्या ४ जणांना अज्ञात वाहनानं चिरडलं. यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला असून दोघं जण गंभीर जखमी झाले आहेत. मानवत तालुक्यातील केकरजवळा येथील ही घटना असून चौघांना चिरडून वाहन चालक फरार झाल्याची माहिती मिळतेय.


कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडणार

कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडणार आहेत. दुपारी 2 वाजता कोयनेतून 10 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असून नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरण परिसरात पडत असलेल्या तुरळक पावसामुळे हा निर्णय घेण्यात आला


राज्यात सर्वाधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यात पुणे जिल्हा अव्वल

राज्यात सर्वाधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यात पुणे जिल्हा अव्वल असून तेथे आतापर्यंत तब्बल ९० लाख लोकांच झालं लसीकरण करण्यात आले आहे. काल दिवसभरात १ लाख ५६ हजार ६२० जणांच झालं विक्रमी लसीकरण झाले आहे.


कल्याणच्या आधारवाडी कारागृहात बराकीची तपासणी करण्यासाठी आलेल्या जेलरसह त्यांच्या मदतीसाठी आलेल्या पोलीस शिपायावर दोन कैद्यांनी हल्ला केला. एका टोकदार वस्तूने त्यांनी जेलवर वार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात महम्मद अल्ताफ उर्फ आफताब खालिद आणि दिलखुश उर्फ अंकित महेंद्र प्रसाद या दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

- Advertisement -