Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update: उत्तराखंडमध्ये हिमस्खलनाचा प्रकोप, ८ जणांचा मृत्यू, 430 लोकांना बाहेर काढण्यात...

Live Update: उत्तराखंडमध्ये हिमस्खलनाचा प्रकोप, ८ जणांचा मृत्यू, 430 लोकांना बाहेर काढण्यात यश

Related Story

- Advertisement -

उत्तराखंडमध्ये हिमस्खलनाचा प्रकोप, आठ जणांचा मृत्यू, 430 लोकांना बाहेर काढण्यात यशउत्तरखंडच्या चामोलीत पुन्हा एकदा हिमस्खलनाचा प्रकोप पाहायला मिळाला आहे. ही दुर्घटना शुक्रवारी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय लष्कराला या घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. हिमस्खलनामुळे अनेक लोक मलब्याखाली अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जवानांनी आतापर्यंत 430 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. तर अजूनही 425 ते 430 लोक अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.


- Advertisement -

कोरोनाची लागण झाल्याने अमित ठाकरेंना लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आले होते. 20 एप्रिलपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते मात्र लक्षणे कमी झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या 48 व्या सरन्यायाधीशपदी एन.व्ही. रमणा; रामनाथ कोविंद, नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शपथ


- Advertisement -

अनिल देशमुखांच्या घर, कार्यालयासह 10 ठिकाणी सीबीआयची छापेमारी


मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणात सीबीआय विविध ठिकाणी शोध घेत आहे.


मुंबईत कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी आणि प्रवासासाठी अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. असे असतानाही मुंबईच्या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी न झाल्याने मुंबई पोलिसांनी अत्यावश्यक सेवेतील आणि खासगी वाहनांसाठी तीन कलर कोड निश्चित केले होते. मात्र या कलर कोडमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढल्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला असून कलर कोडचे आदेश आठवड्याभरातच रद्द करण्यात आला आहे.

- Advertisement -