घरदेश-विदेशमहाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर पुढचं पाऊल काय? दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची गृहमंत्र्यांसोबत बैठक

महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर पुढचं पाऊल काय? दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची गृहमंत्र्यांसोबत बैठक

Subscribe

महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादामुळे दोन्ही राज्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या मुद्द्यावरून आता दोन्ही राज्यात राजकीय आरोप – प्रत्यारोपांना उधाण आले, तर काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी राजकीय पक्षांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीत जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर आता गृहमंत्री अमित शाह पुढे काय पाऊलं उचलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच अमित शाहांच्या मध्यस्थीनंतर कर्नाटक काय भूमिका घेणार याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे. (maharashtra karnataka border dispute cm eknath shinde and karnataka cm bommai meeting with home minister amit shah in delhi)

अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी बेळगाव जिल्हा कन्नड कृती समितीकडून बोम्मई यांना पत्र लिहिण्यात आले आहे. यात कोणत्याही परिस्थितीत बेळगाव आणि इतर परिसर महाराष्ट्राला देण्याबाबत तडजोड करु नका, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या अमित शाहांसोबतच्या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार? आणि सीमावादावर अमित शाह काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर यापूर्वी महाविकास आघाडीच्या खासदारांनी 9 डिसेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या खासदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अमित शाहांकडे तक्रार केली होती. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता गृहमंत्री अमित शाह 14 डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत. महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादावर परस्पर समन्वयाने तोडगा काढू असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली होती.

खासदाराची गृहमंत्री अमित शाहांकडे केली तक्रार

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने महाराष्ट्राबाबात विधानं करत आहेत, असं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले. महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले केले जातात, राज्यातील मंत्र्यांना कर्नाटकात येण्यापासून रोखले जाते, संविधानानुसार, देशात कुठेही जाण्याचा हक्क आहे. याला अडकाळी केली जाते, याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितल्याची अमोल कोल्हे यांनी दिली आहे.


‘धनुष्यबाण’ कोणाचं? ठाकरे गट दिल्ली उच्च न्यायालयात

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -