घरताज्या घडामोडीBeating Retreat: महात्मा गांधींच्या आवडत्या प्रार्थनेच्या सूराला बिटिंग द रिट्रीट कार्यक्रमातून वगळलं,...

Beating Retreat: महात्मा गांधींच्या आवडत्या प्रार्थनेच्या सूराला बिटिंग द रिट्रीट कार्यक्रमातून वगळलं, काँग्रेस आक्रमक

Subscribe

देशात राष्ट्रपिता महात्मा गांधींवरून पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजपामध्ये खडाजंगी सुरू झाली आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. प्रजासत्ताक दिनानंतर तीन दिवसांनी म्हणजे २९ जानेवारी रोजी बिटिंग द रिट्रीट हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. तसेच या कार्यक्रमामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सांगता होते. परंतु २९ जानेवारी रोजी पार पडणारा हा सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या अबाई़़ड विथ मी या आवडत्या प्रार्थनेच्या सूराला यंदाच्या बिटिंग द रिट्रीट कार्यक्रमातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली असून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

महात्मा गांधींचा वारसा पुसून टाकण्याचा प्रयत्न

बिटिंग द रिट्रीट या कार्यक्रमात महात्मा गांधींच्या आवडच्या प्रार्थनेचे सूर ऐकायला मिळणार नाहीयेत. कारण त्यांच्या आवडत्या सूराला कार्यक्रमातून वगळण्यात आलं आहे. ही प्रार्थना महात्मा गांधींची आवडती असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा वारसा जाणीवपूर्वक पुसून टाकण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.

- Advertisement -

केंद्रातील सरकार गोडसेंच्या विचारांवर चालणारी

काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी ट्विट केले की, यावेळी गांधीजी आणि त्यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांच्या विचारांना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये वैचारिक युद्ध सुरू आहे. केंद्रातील सरकार गोडसेंच्या विचारांवर चालणारी आहे. गांधीजींविरोधात टीका करणाऱ्यांवर ते कोणतीही कारवाई करत नाही, असं गौरव वल्लभ म्हणाले.

बिटिंग द रिट्रीट या कार्यक्रमातून महात्मा गांधींची आवडती प्रार्थना वगळण्यात आली आहे. बापूंचा वारसा पुसून टाकण्याचा भाजप सरकारचा हा आणखी एक प्रयत्न असल्याचं काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी ट्विट करत म्हटलं आहे. तसेच त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

- Advertisement -

भाजपनं काय दिलं उत्तर ?

अबाई़़ड विथ मी या प्रार्थनेऐवजी सारे जहाँ से अच्छा हे संगीत बिटिंग द रिट्रीटच्या कार्यक्रमात ठरवण्यात आल्याचे भाजप सरकारचे म्हणणे आहे. तसेच काँग्रेस बिनबुडाचे आरोप करत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे.

काय आहे या सूर आणि प्रार्थनेचा इतिहास ?

अबाई़़ड विथ मी ही ट्यून १८४७ मध्ये स्कॉटलँडमधील अँग्लिकन कवी हेन्री फ्रान्सिस लाइट यांनी तयार केली होती. १९५० पासून हे सूर बिटिंग द रिट्रीट या कार्यक्रमाचा एक भाग आहे. युद्धाच्या दरम्यान सूर्यास्ताच्या वेळी हा सूर वाजवला जात होता. तेव्हा सैनिक युद्ध थांबवत असत. मात्र, आता या सूरावरून देशात राजकीय युद्धाला सुरूवात झाल्याचे दिसत आहे.


हेही वाचा : Balasaheb Thackeray Birth Anniversary: ५० हजार दिव्यांनी उभारले बाळासाहेबांचे भव्य पोट्रेट, मराठमोळ्या कलाकाराचे अभिवादन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -