घरदेश-विदेशलैंगिक शोषणप्रकरणी मेजर जनरल दोषी

लैंगिक शोषणप्रकरणी मेजर जनरल दोषी

Subscribe

सैन्यदलातील एक मेजर जनरल लैंगिक शोषण प्रकरणी दोषी ठरला आहे. एका महिला अधिकाऱ्याचे लैंगिक छळ केल्याप्रकरणी आर्मी जनरल कोर्ट मार्शलने मेजर जनरलला दोषी ठरवले आहे.

भारतीय लष्करातील एका मेजर जनरलला महिला अधिकाऱ्याचे लैगिंक शोषण केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मेजर जनरलने २०१५ मध्ये झालेल्या सर्जिकल सट्राईकमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या मेजर जनरलने लैंगिक शोषण केल्याची तक्रार एका महिला अधिकारीने केली होती. याप्रकरणी आर्मी जनरल कोर्ट मार्शलने मेजर जनरलला दोषी ठरवत त्याला लष्करातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मेजर जनरलने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

हेही वाचा – #MeToo : ‘सलमान खाननं माझा लैंगिक छळ केला’

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

२०१५ मध्ये झालेल्या सर्जिकल स्टाईकमध्ये या मेजर जनरलने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्याला पदोन्नती देण्यात आली होती. यानंतर मेजर जनरलला देशाच्या नैऋत्य राज्यांमध्ये तैनात करण्यात आले. दरम्यान, एका कॅप्टन पदावर असणाऱ्या महिला अधिकाऱ्याचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली. महिला अधिकाऱ्याने याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीवर खटला चालला आणि आर्मी जनरल कोर्ट मार्शल कोर्टने मेजर जनरलला दोषी ठरवले. कलम ३५४ (अ) अन्वये त्याला दोषी ठरवण्यात आले आहे.

हेही वाचा – गुजरातमध्ये २५ होमगार्ड महिलांवर लैंगिक अत्याचार

- Advertisement -

मेजर जनरलने फेटाळले आरोप

दरम्यान, आपल्यावरील आरोप खोटे सांगत मेजर जनरलने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. २०१६ मध्ये लष्करप्रमुखांची बदली झाली. यावरुन निर्माण झालेल्या गटबाजीचा मी बळी आहे, असे मेजर जनरल म्हणाला आहे. त्याचबरोबर जनरल कोर्ट मार्शलच्या निकालाला आव्हान देणार असल्याची माहिती मेजर जनरलची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी दिली आहे. मेजर जनरलची बाजू समजून घेतली नाही आणि निकाल घाईघाईने लावला गेला, असेही त्यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – #MeToo – नंदिता दासचे वडील जतीन दास यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -