घरदेश-विदेशCorona: ३० दिवस व्हेंटिलेटरवर राहूनही खचला नाही; केली कोरोनावर यशस्वी मात

Corona: ३० दिवस व्हेंटिलेटरवर राहूनही खचला नाही; केली कोरोनावर यशस्वी मात

Subscribe

जगात चमत्कारीक गोष्टी घडतात, यावर काहींचा विश्वास असतो तर काहींचा नसतो. मात्र वैद्यकीया क्षेत्रात अशा अनेक घडना घडत आल्या आहेत. ज्याला चमत्काराशिवाय दुसरं काहीच बोलू शकत नाही. अशी एक घटना ब्रिटनमधील एसेक्स येथे घडली आहे. उमर टेलर या ३१ वर्षीय युवकाने विविध आजारांनी झगडून कोरोनासारख्या विषाणूला हरवून आपले आयुष्य पुन्हा मिळवले आहे. कोरोनाबाधित हा युवक तब्बल ३० दिवस व्हेंटिलेटरवर होता. या दरम्यान, त्याला न्युमोनिया, सेप्सिस, हार्ट फेल आणि दोन वेळा स्ट्रोकचा सामना करावा लागला. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही उमर वाचेल अशी आशा सोडली होती. मात्र आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवणाऱ्या उमरने सर्व आजारांना मागे टाकत नवे आयुष्य मिळवले. संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोरोनावर यशस्वी मात केली.

(फोटोज- Kaitlyn Taylor)

उमर टेलर हे हेल्थ केअर कंपनीमध्ये रिजलन डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत. कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत गेली. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले. डॉक्टरांनीही कुटुंबियांना आशा सोडून दिल्याचे सांगितले. शिवाय उमर कधीही आपल्या पायांवर चालू शकणार नाही, याची शक्यता वर्तवली. उमरची पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. मात्र या सगळ्याला खोट ठरवत उमर स्वःता आपल्या पायावर चालत बरा होऊन हॉस्पिटलच्या बाहेर आला.

- Advertisement -
(फोटोज- Kaitlyn Taylor)

उमरची पत्नी केटलिन टेलर यांनी सांगितले की आधी डॉक्टरांनी सांगितले उमर मरणार आहे, मग म्हणाले ते पायावर चालू शकणार नाही, त्यामुळे आम्ही खुपच घाबरलो होतो. उमर यांच्यावर ८ आठवडे उपचार सुरू होते. त्यातील ३० दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. उमर यांना इन्ड्युस्ड कोमामध्ये ठेवण्यात आले होते. कोमातून बाहेर आल्यानंतर त्यांनी बोलण्याची शक्ती गमावल्याचे समजले. मात्र हळूहळू प्रकृतीत सुधारणा होत गेली. ते एक – एक शब्द उच्चारू लागले. अखेर त्यांनी सर्व आजारांना हरवून विजय मिळवला.

हेही वाचा –

Video : भयंकर! एका छोट्या नाल्याने आजूबाजूचे सगळं केले गिळंकृत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -