घरताज्या घडामोडीVideo : भयंकर! एका छोट्या नाल्याने आजूबाजूचे सगळं केले गिळंकृत

Video : भयंकर! एका छोट्या नाल्याने आजूबाजूचे सगळं केले गिळंकृत

Subscribe

एका छोट्या पाण्याच्या प्रवाहाने सर्व काही नष्ट केले आहे.

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्काच बसेल. कारण या व्हिडीओत जे घडले आहे ती खरच चकीत करणारी अशी भयंकर गोष्ट आहे. हा व्हिडीओ केनियामधला असल्याचे समोर आले आहे. या व्हिडीओत एक छोटा नाला दिसत असून या नाल्याने आपल्या आजूबाजूला असलेले सर्व गवत गिळंगृत केले आहे. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल ना. पण, हे खरे आहे की एका छोट्या पाण्याच्या प्रवाहाने सर्व काही नष्ट केले आहे.

काय आहे या व्हिडीओत

या व्हिडीओमध्ये एक छोटा नाला दिसत आहे. तसेच नुकताच पाऊस होऊन गेल्याने आजूबाजूला पाणी साचले आहे. त्यासोबतच गवत देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत आहे. या व्हिडीओत पाण्याचा छोटा नाला तयार झाला आहे आणि तो आपल्या आजूबाजूला असलेले सर्व गवत पाण्याच्या प्रवाहासोबत आत खेचताना दिसत आहे.

- Advertisement -

दरम्यान, हे दृश्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. एखादा छोटासा नाला एवढ्या मोठ्या गोष्टी गिळंकृत कसा करु शकतो?, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

- Advertisement -

ज्या प्रदेशात ही घटना घडली आहे. तो पूर्व-आफ्रिकन ग्रेट रिफ्ट व्हॅलीचा एक भाग आहे. जो आफ्रिकन प्लेटला दोन स्वतंत्र प्लेटमध्ये विभागायचा आहे. हे एक टेक्टॉनिक झोन आहे. जे ज्वालामुखीसारखे दिसत आहे. तसेच याठिकाणी बरेच छिद्र दिसून येत आहेत. तसेच, याठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून याठिकाणची माती निघून गेली असावी. कारण तळाशी पोकळी दिसून येत आहे. त्यामुळे हा नाला पाण्यासह गवत शोषताना दिसत आहे. २०१७ मध्ये अशीच एक घटना फ्लोरिडामध्ये घडली होती. त्यावेळी तब्बल २२० फूट खोल नाला तयार झाला होता आणि त्या नाल्यामध्ये दोन घरे देखील गिळंकृत केली होती.


हेही वाचा – लग्न करुन नवरी – नवरदेव फसले; शेजारचे विचारतात कधी येणार?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -