घरताज्या घडामोडीटीव्हीचा रिमोट मागितला म्हणून ७ वर्षीय मुलीची हत्या

टीव्हीचा रिमोट मागितला म्हणून ७ वर्षीय मुलीची हत्या

Subscribe

आपल्या घरात वीज नसल्यामुळे एक सात वर्षांची मुलगी शेजाऱ्यांच्या घरात जाऊन टीव्ही पाहायची. तिथे ती तिला हवी असलेली वाहिनी लावण्यासाठी रिमोटची मागणी करत असल्यामुळे घरातील व्यक्तीने रागाच्या भरात मुलीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह प्लास्टिक ड्रममध्ये टाकून तो गावाबाहेरील कालव्यात सोडून दिला. माणुसकीला हिंस्त्रपदी नेऊन ठेवणारी ही घटना तामिळनाडूच्या थोट्टूकुडी जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपी आणि त्याला या गुन्ह्यात मदत करणाऱ्या त्याच्या मित्राला बेड्या ठोकल्या आहेत.

या मुलीची आई रोजंदारीवर काम करते. थोट्टूकुडी जिल्ह्यातील सथनकुलम भागात हे लोक राहत होते. मुलीच्या घरात वीज नसल्यामुळे ती नेहमी शेजारच्यांच्या घरी जाऊन टीव्ही पाहत असे. ज्या दिवशी गुन्हा घडला त्यादिवशी आरोपी मुलगा आपल्या वडिलांसोबत भांडण करत होता. त्यातच मुलगी रिमोटची मागणी करत असल्यामुळे त्याचा रागाचा पारा चढला आणि त्याने मुलीचा गळा आवळून खून केला.

- Advertisement -

पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या मित्राला अटक केल्यानंतर तर आणखी धक्कादायक गोष्ट समोर आली. या आरोपीने खून केल्यानंतर थंड डोक्याने मृतदेहाची विल्हेवाट लावली. आपल्या मित्राच्या मदतीने त्याने मृतदेह प्लास्टिक ड्रममध्ये कोंबला. त्यानंतर त्याच्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कालव्यात हा मृतदेह टाकला.

थोट्टूकुडचे पोलीस अधिक्षक जयकुमार यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले की, “हा गुन्हा सकाळी ११.३० ते १२ च्या दरम्यान घडला. आम्हाला याची माहिती २.३० वाजता मिळाली. त्यानंतर अवघ्या काही तासातच आम्ही आरोपींना जेरबंद केले. त्यांनी आपला गुन्हा देखील मान्य केला आहे. मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.”

- Advertisement -

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा अमली पदार्थाच्या नशेत असायचा. तसेच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषन देखील करायचा. मात्र पोलिसांनी यावर अद्याप प्रतिक्रिया दिली नसून तपास सुरु ठेवला आहे. गुन्हेगारांवर खून आणि पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -