घरCORONA UPDATEमांडा - टिटवाळ्यातील स्मशानभूमीची अवस्था दयनीय; मृतदेह दहन करण्यास अडचण

मांडा – टिटवाळ्यातील स्मशानभूमीची अवस्था दयनीय; मृतदेह दहन करण्यास अडचण

Subscribe

मांडा टिटवाळ्यात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वजनिक स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय आणि केविलवाणी झाली असून आज सकाळच्या सुमारास परिसरातील तीन मृतदेहाला अग्निदान देण्याची वेळ सकाळचीच ठरल्याने मृतदेह एकाच ठिकाणी आले. मात्र नातेवाईकांनी समजूतदारपणा घेत दोन मृतदेह टिटवाळ्यात नेले.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची इंदिरानगर येथे सार्वजनिक स्मशानभूमी आहे. तर महागणपती मंदिराच्या नदीकिनारी दुसरी तर मांडा पूर्व येथे एक स्मशानभूमी अशा तीन स्मशानभूमी अस्तित्वात आहेत. इंदिरानगर पश्‍चिम येथे प्रचंड वसाहत वाढल्याने पावसाळ्यात स्मशानभूमी शेड नसल्याने मृतदेहाला दहन करता वेळेस नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मांडा – टिटवाळ्यातील इंदिरानगर येथे स्मशानभूमीला गेल्या आठ वर्षापासून साधी डागडूजी करण्यास कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेला जमले नसल्याने या स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे दिसून येत आहे. कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेबरोबरच लोकप्रतिनिधींचे देखील या स्मशानभूमीकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

टिटवाळा येथील समाजसेवक विजय देशेकर यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून परिसरातील दानशूर व्यक्तींनी या स्मशानभूमीच्या डागडूजीकरता जेसीबी, डंपर, पत्रे, मजूर, माती, मिस्त्री अशा स्वरूपाचे दान करण्याची मागणी केली आहे. इंदिरानगर येथे मृतदेह जाळण्याकरता तीन लोखंडी रॅक होते. मात्र दोन लोखंडी रॅक चोरीला गेल्याने तुटलेल्या या रॅकवर मृतदेहाला अग्नी दिला जात आहे. येथील एका नगरसेवकाने मात्र तीस लाख रुपयांचा निधी या स्मशानभूमी करिता पालिका प्रशासनाकडून उपलब्ध केल्याचे सांगण्यात येत असून विजय देशेकर यांनी येथील स्मशानभूमी पालिका प्रशासन आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करता लाकूड, फाटा मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

अंतिम वर्षाची परिक्षा घेणे घातक ठरु शकते; हायकोर्टाचा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -