घरताज्या घडामोडीधक्कादायक! मामाने केला बलात्कार, पत्नी म्हणून स्वीकारण्यास पतीचा नकार

धक्कादायक! मामाने केला बलात्कार, पत्नी म्हणून स्वीकारण्यास पतीचा नकार

Subscribe

सध्या पीडित महिला आठ महिन्यांची गरोदर तिने मामाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

एका महिलेवर मामाने बलात्कार केला आणि ती गरोदर राहिल्यानंतर तिच्या पतीने पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिल्याची घटना बिहारमधील कटिहार जिल्ह्यात घडली आहे. फालका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी महिलेने मामाविरोधात तक्रार दाखल केली असून मामाने बलात्कार केल्याचा आणि त्याच्यापासून गरोदर राहिल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सध्या पीडित महिला आठ महिन्यांची गरोदर आहे.

२० वर्षांची ही विवाहित महिला आपल्या माहेरी राहत होती. तिच्या मामाने तिच्यावर सतत बलात्कार केला आणि त्याच्यापासून ती गरोदर राहिली. त्यामुळे पतीने या पीडितेचा पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. याप्रकरणी पीडित महिलेने मामासह कुटुंबातील अन्य चार जणांवरही तक्रारीमध्ये आरोप केले असून यामध्ये तिच्या आजोबांचेही नाव आहे. दाखल केलेल्या एफआयआरनुसार, तिच्या मामाने बलात्कार करून याबाबत कुठे बोल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मग त्यानंतर तो सातत्याने तिच्यावर बलात्कार करत होता. तिला लाथाबुक्कांनी मारहाण देखील केली आणि तिला घराबाहेर काढून दिले. मग यानंतर ती पतीकडे गेली पण त्यांनी तिचा स्वीकार करण्यास नकार दिला. हे प्रकरण दाबण्यासाठी पैस देण्याचा प्रयत्न केला. परंतु पीडितेने न्यायासाठी लढा देण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेच्या आईचे निधन झाल्यानंतर तिच्या आजोबांनी पुर्णिया जिल्ह्यातील रुपौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका व्यक्तीशी लग्न लावून दिले. मात्र ती गेल्या नऊ महिन्यांपासून कटिहारमध्येच आपल्या माहेरी राहत होती. पोलिसांचे पथक बुधवारी जेव्हा आरोपी मामाच्या घरी पोहोचले तेव्हा तो तिथे सापडला नाही. पण पीडितेचा जबाब हा कोर्टासमोर नोंदवला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


हेही वाचा – बलात्काऱ्यांना शिक्षा, पोलीस ठाण्यात जल्लोष, रोषणाई करून आनंद केला साजरा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -