घरताज्या घडामोडीबलात्काऱ्यांना शिक्षा, पोलीस ठाण्यात जल्लोष, रोषणाई करून आनंद केला साजरा

बलात्काऱ्यांना शिक्षा, पोलीस ठाण्यात जल्लोष, रोषणाई करून आनंद केला साजरा

Subscribe

एक वर्षापूर्वी बुलढाणा येथे एका निरागस मुलीवर सामुहिक बलात्कार झाला होता. याप्रकरणी गुरुवारी बुलढाण्याच्या विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या निकालानंतर चिखली पोलिस कर्मचाऱ्यांनी सोहळा असल्याप्रमाणे संपूर्ण पोलिस ठाण्याला विद्युत रोषणाई करून फटाके फोडले आणि आनंद साजरा केला.

नक्की काय घडले होते?

२६ जुलै २०१९ रोजी रात्रीच्या सुमारास २ तरुणांनी ९ वर्षांच्या निरागस मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलगी आई-वडिलांसोबत झोपली होती. त्यावेळेस या दोन तरुणांनी तिला उचलून नेले. शहरातील एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी सागर विश्वनाथ बोरकर आणि निखल शिवाजी गोलाईत यांच्याविरोधात बलात्कार, पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांना शिक्षा व्हावी यासाठी स्थानिक नागरिकांनी मोर्चे काढले आणि एक दिवस शहरही बंदी ठेवले होते.

- Advertisement -

गुरुवारी या बलात्कार प्रकरणातील अंतिम सुनावणीत दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे न्यायालयाबाहेर पोलिसांनी बंदोबस्त लावण्यात आला होता. या घटनेनंतर पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने सांगितले की, ‘औरंगाबादमध्ये या पीडित मुलीचे दोन मोठी ऑपरेशन करण्यात आली.’ अशी घटना कोणासोबत पुन्हा घडून नये अशी ती प्रार्थना करत असल्याचे माहिला पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले.

चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ म्हणाले की, ‘पीडित मुलीच्या आईचे मानसिक संतुलन ठिक नाही आहे. या मुलीच्या कुटुंबाची सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न चिखली पोलीस कर्मचारी करत आहेत. न्यायालयाने आरोपींना फांसी शिक्षा सुनावल्यानंतर चिखल पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांनी सोहळ्याप्रमाणे पोलीस ठाणे सजवले आणि फटाके फोडून आनंद साजरा केला. असे मानले जात की, भारताच्या इतिहासातील हे पहिले पोलीस ठाणे असेल, जे आरोपींना शिक्षा झाल्यावर संपूर्ण पोलीस ठाण्याला रोषणाई करून फटाके फोडले’

- Advertisement -

हेही वाचा – बायकोला पळून नेणाऱ्या मित्राचा केला खून


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -