घरदेश-विदेशअरविंद केजरीवाल यांच्यावर फेकली मिरचीपूड

अरविंद केजरीवाल यांच्यावर फेकली मिरचीपूड

Subscribe

धक्काबुक्कीत केजरीवाल यांचा चष्मा तुटला आहे.

दिल्ली सचिवालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर सचिवालयामधील सुरक्षेचा मुद्दा एरणीवर आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका अज्ञात तरुणाने मिरचीपूड फेकली. त्यानंतर धक्काबुक्की झाली आहे. या धक्काबुक्कीत केजरीवाल यांचा चष्मा तुटला आहे. सुदैवाने केजरीवाल यांना मोठी इजा झाली नाही. पोलिसांनी मिरचीपूड फेकणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.

हेही वाचा – पदकविजेत्या दिव्या काकरानचे केजरीवालांवर टिकास्त्र

- Advertisement -

काय आहे नेमका प्रकार?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली सचिवालयात आपल्या कार्यालयात आले होते. ते एक बैठक घेऊन बाहेर निघाले होते. एक अज्ञात तरुण सचिवालयाच्या बाहेर उभा होता. त्याने माचिसच्या डबीत मिरचीपूड आणली होती. केजरीवाल समोर येताच तरुणाने केजरीवाल यांच्या अंगावर मिरचीपूड टाकली. यादरम्यान, धक्काबुक्की सुद्धा झाली. या धक्काबुक्कीत केजरीवाल यांचा चष्मा तुटला. सुदैवान केजरीवाल यांना मोठी इजा झाली नाही. पोलिसांनी केजरीवाल यांच्यावर मिरचीपूड फेकणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. या तरुणाचे नाव अनिल कुमार शर्मा असे आहे.

हेही वाचा – अरविंद केजरीवाल,मनिष सिसोदियांविरोधात आरोपपत्र दाखल

- Advertisement -

याअगोदरही अशा घटना घडल्या आहेत

याअगोदरही अरविंद केजरीवाल यांच्यासोबत अशा घटना घडल्या आहेत. दिल्लीत एका कार्यक्रमात महिलेने केजरीवाल यांच्यावर शाही फेकली होती. त्याचबरोबर एका रॅलीमध्ये रिक्षा चालकाने केजरीवाल यांना थोबाडीत मारली होती. या दोन घटनांनतर केजरीवाल यांच्यासोबत अशाप्रकारची घटना घडणारी ही तिसरी घटना आहे.


हेही वाचा – हिंदु-मुस्लिम वाद हवा कशाला?अरविंद केजरीवालांचा पंतप्रधानांना सवाल

हेही वाचा – मोदी तुम्ही तरी हस्तक्षेप करा! केजरीवालांचे पंतप्रधानांना आर्जव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -