घरताज्या घडामोडीमणिपुरच्या तरुणीला कोरोना म्हणून मारली हाक आणि केला प्राणघातक हल्ला!

मणिपुरच्या तरुणीला कोरोना म्हणून मारली हाक आणि केला प्राणघातक हल्ला!

Subscribe

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ७८ हजारपार झाला आहे. परंतु या कोरोनाच्या संकटात ईशान्येकडील एका व्यक्तीवर वर्णभेदावरून मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूर येथील रहिवासी असलेली चोंग होई मिसाओ या २० वर्षीय तरुणीवर रविवारी हरयाणाच्या गुरुग्राम येथील फैजापूरमधील लोकांनी प्राणघातक हल्ला केला आहे.

पीडितेच्या जवळचा मित्र जोएल म्हणाला की, ती तिथे एका मित्राला भेटण्यासाठी आणि दुपारच्या जेवण्यासाठी आली होती. परत येत असताना मिसाओला एका महिलेने थांबवून तिच्याशी उद्धटपणे बोलू लागली. त्या महिलेने घराच्या समोरच्या रस्त्यावरून जाण्यास तिला मनाई केली आणि तिच्यावर अत्याचार केला.

- Advertisement -

माहितीनुसार, त्यावेळेस जेव्हा मिसाओने त्या महिलेल्या विनम्रपणे बोलण्याची विनंती केली तेव्हा तिला शिव्या दिल्या आणि कोरोना असे म्हटले गेले. त्यानंतर तिने पोलिसात जाईल असे सांगितले. यावर महिलेने पोलिस आमच्या बाजूने आहेत असे उत्तर दिले. या वाद वाढल्यानंतर महिलेच्या घरातील सर्व सदस्य, ज्यात जावई आणि तिचा मुलगा आला आणि तरुणीवर लाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत मिसाओच्या डोक्याला लागले आणि ती बेशुद्ध पडली. मग तिथल्याच स्थानिक लोकांनी तिला वाचवले आणि नंतर सर्व घटनेची माहिती पोलिसांना दिली.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केल्यानंतर तात्काळ आरोपींवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी जखमी झालेल्या मिसाओला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. मग तिचा एफआयआर दाखल करण्यात आला. भारतीय दंड संहिता कलम ३२३, ३४, ३४२ आणि एससी/ एसटी अॅट्रॉसिटी कायदान्वये आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. अजूनही पीडित तरुणी उपचार घेत असून तिचे सीटी स्कॅनचे अहवाल येणे बाकी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Video: …म्हणून इरफान पठाणला आला मिनी हार्ट अटॅक!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -