घरट्रेंडिंग'या' पाच गोष्टींनंतर अजिबात आंघोळ करू नका, जीवावर बेतू शकतं!

‘या’ पाच गोष्टींनंतर अजिबात आंघोळ करू नका, जीवावर बेतू शकतं!

Subscribe

दिवसातील कोणत्याही वेळी आपण आंघोळीबद्दल फारसा विचार करत नाही. पण सकाळी संध्याकाळी अंघोळ करतोच. पण तुम्हाला माहितेय का? दैनंदिन जीवनात अशा काही गोष्टी आहेत ज्या केल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने आपण आजारी पडू शकतो. अशा परिस्थितीत काही काम केल्यावर आपण आंघोळ टाळली पाहिजे किंवा थोड्या वेळाने आंघोळ केली पाहिजे. जर आपण याची काळजी घेतली नाही तर आपल्याला हृदयाची समस्या देखील होऊ शकते,  अर्धांगवायूचा त्रास होण्याची शक्यता देखील वाढू शकते.

. झोपून उठल्यावर लगेचच आंघोळ करू नका

- Advertisement -

– जर आपण सकाळी उठून ताबडतोब आंघोळ करत असाल सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आणि आजच ही सवय सोडली पाहिजे कारण असं केल्याने तुम्ही हार्ट बीपीचेही रुग्ण बनू शकता. झोपेच्या वेळीसुद्धा आपल्या शरीराचे तापमान जास्त असते आणि रक्ताचा प्रवाहही जास्त असतो. जर आपण अंथरुणावरुन उठून शॉवरखाली उभे राहिलो तर आपल्याला सर्दी आणि उष्णतेचा विकार होऊ शकतात. म्हणूनच आपण सकाळी झोपेतून उठल्यावर कमीतकमी अर्ध्या तासानंतर आंघोळीसाठी जायला हवं.

२. बाहेरून आल्यानंतर

- Advertisement -

जर तुम्ही बाहेर चालत गेले असाल आणि घरी आल्यावर लगेचच आंघोळ केली तर त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हे करण्यापूर्वी,  कमीतकमी ३० मिनिटांचा ब्रेक घेणं आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण बाहेरून येता तेव्हा आपल्या शरीरातील उष्णता मोठ्या प्रमाणात वाढलेली असते.  अशा स्थितीत आंघोळ केल्यामुळे शरीरातील तापमान अचानक कमी होते आणि आपल्याला डोकेदुखी आणि ताप येऊ शकतो.

३. रात्रीच्या जेवणानंतर

जेवण झाल्यावर लगेच आंघोळ करू नका. जर तुम्हाला आंघोळ करायची असेल तर जेवणापूर्वी करा. कारण जेवल्यामुळे आपल्या शरीरातील उर्जा वापरली जाते. आणि शरीराचे तापमान देखील वाढते, परंतु जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा पाण्यामुळे आपल्या शरीराचे तापमान कमी होते. अशा परिस्थितीत केवळ पचनावरच परिणाम होऊ शकतो, परंतु ताप किंवा डोकेदुखीचा त्रास देखील होऊ शकतो आणि त्याबरोबरच इतरही अनेक समस्यां उद्भवू शकतात.

४. वर्कआऊट किंवा डान्स केल्यानंतरच

वर्कआउट्स किंवा नृत्य दरम्यान रक्ताभिसरण आपल्या शरीरात खूप वेगाने सुरू होते,ज्यामुळे आपल्याला उबदार वाटते. सामान्यत: उष्णता आणि घाम टाळण्यासाठी व्यायामाने लगेच आंघोळ करतात. असे केल्याने आरोग्यास हानी पोहचू शकते. जेव्हा आपण व्यायाम कराल तेव्हा आपल्या शरीराचे तापमान आणि रक्तदाब स्थिर होऊ द्या, मग आंघोळीसाठी जा.

५. गरम गोष्टी खाल्यानंतर किंवा प्यायल्यावर

बरेचदा आम्ही चहा-कॉफी किंवा सूप पिऊन झाल्यावर आंघोळीला जातो. किंवा काही गरम गरम जेवल्यानंतर अंघोळ करण्यासाठी जातो. हे आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. आपण कोमट पाण्याने आंघोळ करत असाल तर आपण १ तासाने अंघोळ करू शकता. जेव्हा आपण गरम पेयांचे सेवन करतो, तेव्हा आपल्या शरीराचे तापमान बर्‍याच प्रमाणात वाढते, जे सामान्य होण्यासाठी वेळ लागतो.


हे ही वाचा – Photos – एका उत्तराने जगाची मनं जिंकणाऱ्या मिस वर्ल्ड मानुषीचा आज वाढदिवस!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -