घरक्रीडाVideo: ...म्हणून इरफान पठाणला आला मिनी हार्ट अटॅक!

Video: …म्हणून इरफान पठाणला आला मिनी हार्ट अटॅक!

Subscribe

इरफान मिनी हार्ट अटॅक येणार क्षण घटला आहे. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

लॉकडाऊन दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण सोशल मीडियावर फारच सक्रीय असतो. तो अनेक मजेदार व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. अलीकडेच इरफानने आपला भाऊ युसूफ पठाण सोबत एक टिकटॉक व्हिडिओ बनवला होता. ज्यात इरफान रोजामध्ये चुकून पाणी पितो असं दाखवलं होत. इरफानच्या या व्हिडिओला ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पुन्हा एकदा इरफानने मुलगा इम्रानचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओतल्या क्षण प्रत्येक आई-वडिलांना मिनी हार्ट अटॅक येणार आहे.

या व्हिडिओ इरफानचा मुलगा इम्रान चारचाकी सायकल चालवताना दिसत आहे. जेव्हा इम्रान सायकल चालवत असताना काही अंतर गेल्यानंतर टर्न घेत असतो तेव्हा तो सायकलवरून पडतो. या घटनेचा व्हिडिओ इरफान शेअर करत लिहिलं आहे की, ‘प्रत्येक आई-वडिलांना मिनी हार्ट अटॅक येणार क्षण.’ आई-वडिलांना आपल्या मुलांना काहीही झाले तर खूप दुखः होते. त्यामुळे प्रत्येक पालक आपली मुलं मोठी होईपर्यंत काळजी घेत असतात. असाच अनुभव इरफानला देखील आला आहे.

- Advertisement -

इन्स्टाग्रामवर या व्हिडिओला १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यापूर्वी देखील इरफानने आपल्या मुलासोबत अनेक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

- Advertisement -

कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ७८ हजारपार आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनामुळे २ हजार ५४९ जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – म्हणून २००८ साली धोनीने कर्णधार पद सोडण्याची दिली होती धमकी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -