घरदेश-विदेशरिटायरमेंट प्लॅनिंगबाबतीत बहुतांश भारतीय मागे; अहवालातून माहिती समोर

रिटायरमेंट प्लॅनिंगबाबतीत बहुतांश भारतीय मागे; अहवालातून माहिती समोर

Subscribe

रिटायरमेंटबाबत भारतीय नेमका काय विचार करतात याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि कांटार यांनी एकत्रित एक इंडिया रिटायरमेंट इंडेक्स नावाची एक स्टडी (IRIS) केली. या स्टडीमध्ये रिटायरमेंट प्लॅनिंगबाबतील बहुतांश भारतीय मागे पडत असल्याचे समोर आले आहे. भारताचा सेवानिवृत्ती निर्देशांक 0 ते 100 च्या स्केलवर 44 वर होता, जे भारतीय सेवानिवृत्ती नियोजनात मागे असल्याचे दर्शविते.

या स्टडीनुसार, आरोग्य आणि आर्थिक सज्जता निर्देशांक अनुक्रमे 41 आणि 49 वर आहेत. तर भावनिक तयारी 62 वरून तो 59 पर्यंत कमी झाला आहे, जे सेवानिवृत्तीदरम्यान कुटुंब, मित्र आणि सामाजिक समर्थनावर वाढलेले अवलंबन दर्शवते. यात शहरी लोकांना काळजी वाटत असते की, त्यांनी केलेली बचत वृद्धापकाळासाठी पुरेशी पडणार नाही. त्यामुळे सेवानिवृत्तीची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दिशेने तीन शहरी व्यक्तींपैकी फक्त एक व्यक्ती काम करत आहे.

- Advertisement -

विमा कंपनी मॅक्स लाइफ इन्शुरन्सने मार्केटिंग डेटा कंपनी कंटारच्या भागीदारीत हे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जवळपास 90 टक्के लोकांनी सेवानिवृत्तीनंतरच्या जीवन बचतीसाठी लवकरात लवकर करिअर सुरू न केल्याबद्दल खंत व्यक्त केली.

इंडिया रिटायरमेंट इंडेक्स स्टडी (IRIS) सर्वेक्षणाच्या दुसऱ्या आवृत्तीत 44 वर होता, जो गेल्या एका वर्षात सेवानिवृत्ती जीवन नियोजनासाठी शहरी पगारदार वर्गामध्ये तयारीचा अभाव दर्शवितो. सर्वेक्षणात 28 शहरांतील 3,220 स्त्री-पुरुषांचे मत घेण्यात आले. यामध्ये सहा महानगरे आणि 12 प्रथम आणि 12 द्वितीय श्रेणीतील शहरांचा समावेश आहे.

- Advertisement -

मॅक्स लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) प्रशांत त्रिपाठी यांनी येथे पत्रकारांना सांगितले, “मला वाटते की तुम्ही जेव्हा निवृत्तीचा विचार सुरू करता तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात. अशी काही वास्तविकता आहेत ज्यांबद्दल प्रत्येकजण बोलतो की भारत खूप तरुण देश आहे परंतु भारत देखील वृद्ध होत आहे. भारतीयांनी त्यांचे निवृत्तीचे नियोजन लवकर सुरू केले पाहिजे जेणेकरून ते आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि निरोगी जीवन जगण्यास तयार असतील.


अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 19 जणांचा मृत्यू, 27 जखमी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -