घरदेश-विदेशअफगाणिस्तानच्या काबूलमध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 19 जणांचा मृत्यू, 27 जखमी

अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 19 जणांचा मृत्यू, 27 जखमी

Subscribe

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भीषण आत्मघाती स्फोट झाला आहे. यात किमान 19 जणांचा मृत्यू झाला असून 27 जण जखमी झाले आहेत. काबूलमधील पीडी 13 च्या काज एज्युकेशन सेंटरमध्ये आज सकाळी 7.30 च्या सुमारास हा आत्मघाती स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

काबूल पोलिस प्रवक्त्याने दिलेले माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे पश्चिम काबूलच्या दश्त-ए-बारची भागात झालेल्या स्फोटात किमान 19 लोक ठार झाले आणि 27 जण जखमी झाले आहेत. ज्या भागात हा स्फोट झाला तो शिया-मुस्लिमबहुल भाग असून, तिथे अल्पसंख्याक हजारा समाज राहतो. या स्फोटादरम्यान विद्यार्थी या कोचिंग सेंटरच्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्याची तयारी करत होते. यावेळी हल्लेखोरोने स्वतःला आत्मघाती बॉम्बने उडवले.

- Advertisement -

अल जझीराच्या वृत्तानुसार, या घटनेनंतरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये रक्ताने माखलेल्या पीडितांना रुग्णालयात नेले जात आहे. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, या कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थी हायस्कूलच्या पदवीची तयारी करत होते. या स्फोटादरम्यान विद्यार्थी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेचा सराव करत होते. दरम्यान अफगाणिस्तानमधील शाळा सहसा शुक्रवारी बंद असतात.

नागरी वस्तींवर लक्ष ठेवत हल्ला केल्याने शत्रूची अमानवी क्रूरता आणि नैतिक मानकांचा अभाव सिद्ध होतो. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या स्फोटानंतर रुग्णवाहिका पीडितांना घेऊन रुग्णालयात पोहोचत होती, त्यादरम्यान मृत आणि जखमींची यादी भिंतींवर चिकटवण्यात आली होती.


सुरतमध्ये रुग्णवाहिकेत सापडल्या 25 कोटींच्या नोटा, पोलीस तपासात आला वेगळाच ट्विस्ट


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -