घरमनोरंजन'मी तुम्हाला माझा आदर्श मानते'; रश्मिकाने माधुरीबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

‘मी तुम्हाला माझा आदर्श मानते’; रश्मिकाने माधुरीबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

Subscribe

अशातच माधुरी दीक्षित ह्या माझ्या प्रेरणास्थान आहेत असा खुलासा लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने केला आहे.

बॉलिवूडची धक धक गर्ल अशी ओळख असलेली अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने तिच्या अभिनयाने, नृत्याने आणि हास्याने सर्वाना घायाळ केलं आहे. माधुरी दीक्षितचे अनेक चाहतेसुद्धा आहेत. माधुरी दीक्षित सोशल मीडियावर सतत चर्चेत सुद्धा असतात. चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेत्रींच्या त्या आदर्श सुद्धा आहेत. अशातच माधुरी दीक्षित ह्या माझ्या प्रेरणास्थान आहेत असा खुलासा लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने केला आहे.

हे ही वाचा – ‘बिग बॉस 16’मध्ये होणार मिस इंडिया रनरअप मान्या सिंहची एन्ट्री

- Advertisement -

सध्या अभिनेत्री माधुरी दीक्षित चित्रपट, टेलिव्हिजन आणि मालिका या तिन्ही क्ष्रेत्रातून प्रेक्षकांसमोर येत आहे. सध्या माधुरी दीक्षित झलक दिखला जा या डान्स रिऍलिटी शो मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. प्रत्येक आठवड्यात या कार्यक्रमामध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. या आठवड्यात आघाडीची दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना झलक दिखला जा या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. त्याचाच एक प्रोमो नुक्ता आऊट झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये रश्मिकाने माधुरीला सांगितले, “ मी तुम्हाला माझा आदर्श मानते, तुमच्या गाण्यांवर नृत्य करत मी अभिनेत्री झाले आहे. आज मी इथवर पोहोचण्याचं कारण माधुरी जी तुम्ही आहात”. रश्मिकाचं हे बोलणं ऐकून माधुरीनेही रश्मिकाला मिठी मारली. यासोबतच माधुरीने रश्मिकाच्या ‘सामी सामी’ गाण्यावरही रश्मिकाबरोबर नृत्य केलं. हाच व्हिडीओ इंस्टाग्रामवर दिसत आहे.

हे ही वाचा – ‘तुमची मुलगी काय करते’ मालिकेत दोन मैत्रिणी दिसणार पुन्हा एकत्र; होणार ‘या’ अभिनेत्रीची एंट्री

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -