घरदेश-विदेशआता २४ तास ATM मधून मिळणार औषधं; दुर्गम भागातील नागरिकांना होणार फायदा

आता २४ तास ATM मधून मिळणार औषधं; दुर्गम भागातील नागरिकांना होणार फायदा

Subscribe

आपण आता पर्यंत पैसे काढण्याचं एटीएम मशीन पाहिलं आहे. बँका बंद असल्या तरी आपल्या गरज असले तेव्हा पैसे काढण्याची सोय बँकेने एटीएम मशीद्वारे शक्य केली आहे. मात्र आता अशीच व्यवस्था औषधांच्या बाबतीत सुरू होणार आहे. कारण आता २४ तास एटीएममधून औषधं मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. देशातील प्रत्येक ब्लॉकमध्ये औषधांचं हे मशीन बसवण्यात येणार असून त्याद्वारे दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना गरज असेल तेव्हा औषधं उपलब्ध होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशामधल्या एकूण सहा हजार ब्लॉकमध्ये असे औषधांचं एटीएम मशीन बसवण्यात येणार आहे. डॉक्टरांनी दिलेली प्रिस्क्रिप्शनची चिठ्ठी या मशीनमध्ये टाकल्यानंतर ही औषधं मिळतील. केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटर आणि आंध्र प्रदेशमधील ATMZ या संस्थेमध्ये अशा प्रकारचा करार करण्यात आला आहे.

यापूर्वीपासूनच केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटरच्या मार्फत ब्लॉक स्तरावर अयूर संजिवनी केंद्र सुरु असून याच केंद्रावर आता ही औषधांची एटीएम बसवण्याच्या निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासोबतच गर्भधारणा, कोरोना तपासणी, ऑपरेशन संबंधी औषधं आणि इतर अनेक वैद्यकीय उपकरणं आणि इतर प्रकारची औषधं या एटीएममधून ग्राहकांना मिळू शकणार आहे.

- Advertisement -

पैशाप्रमाणे औषधंही २४ तास उपलब्ध

कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकांना पुढील महिन्यापासून या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. ब्लॉक स्तरावर बसवण्यात येणाऱ्या या एटीएममधून जेनेरिक औषधं ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या एटीएमना ई-कॉमर्स कंपन्यांकडून औषध पुरवली जाणार आहे. देशातील सहा हजार ब्लॉकमध्ये कॉमन सर्व्हिस सेंटरच्या अयूर संजिवनी केंद्रावर औषधांची ATM बसवण्यात येणार आहेत. अशा प्रकारची व्यवस्था ही ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना डोळ्यासमोर ठेऊन सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना आता पैशाप्रमाणे औषधंही २४ तास उपलब्ध होणं शक्य होणार आहे.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -