घरदेश-विदेश'पुतिन'यांना भेटून श्रीमती ट्रम्पच्या चेहऱ्यावरली का बदलले भाव

‘पुतिन’यांना भेटून श्रीमती ट्रम्पच्या चेहऱ्यावरली का बदलले भाव

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यात नुकतीच भेट झाली. या भेटीदरम्यान त्यांच्या पत्नी मोलानिया ही उपस्थीत होत्या. भेटीदरम्यान श्रीमती ट्रम्पचा रडका चेहरा सोशल मीडियावर व्हायरल झाला. भेटीनंतर त्यांना रडू कोसळेल की काय असे वाटत होते. नेहेमीच ऐटीत राहणारे डोनाल्ड ड्रम्पही पुतिन यांच्यासमोर फिके पडले. हा व्हिडिओ ट्विटरवर टाकण्यात आला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला मोलानिया व्लादिमीर पुतिन यांना हसत भेटल्या. मात्र भेटीनंतर त्यांच्या चेहऱ्यावरील बदलत्या भावामुळे अनेकांनी भूवया उंचावल्या. अमेरिका आणि रशिया दरम्यान नुकतीच शिखर परिषद झाली. या परिषदेमुळे अमेरिका आणि रशियातील संबध सुधारणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. बैठकीनंतर बाहेर आल्यावर यादोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिली.

 

- Advertisement -

ट्रम्प आणि पुतिन यांची भेट नुकतीच झाली आहे मात्र या अगोदर प्रसिद्ध फोब्रजच्या मासिकाने जागातील सर्वात शक्तीशाली नागरिकांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादी अनूसार चीन चे राष्ट्रपती शी झिनपिंग हे प्रथम क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि तीसऱ्या क्रमांकावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. रशियाचे राष्ट्रपती हे ट्रम्पहून अधिक शक्तीशाली असल्याचा दावा मासिकाने केला आहे. या परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने अनेक नागरिक दुखावले गेले आहेत. यामध्ये त्यांच्या पक्षातील मंत्र्यांचाही समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी परिषदेमध्ये महत्वाचे मुद्दे घेतले नसल्यामुळे ही नाराजी असल्याचे सांगण्यात येतेय.

सीरिया, युक्रेन आणि चीन संबधात जोडलेल्या मुद्यांबाबत चर्चा परिषदेदरम्यान करण्यात आली. या परिषदेत ट्रम्प पुतिनच्या बाजूला उभे होते. ट्रम्पयांनी या चर्चेदरम्यान घेतलेल्या मुद्यांवर माहिती देणे टाळले. अमेरिकेत झालेल्या निवडणूकीदरम्यान रशियाकडून कोणत्याही प्रकारची मदत घेतली नसल्याचे ट्रम्पय यांनी सांगितले.”रशियाने कधीही अमेरिकेच्या आंतर्गत प्रश्नांमध्ये हस्तक्षेप केला नाही.” – असे पुतिन म्हणाले.

- Advertisement -

“अमेरिका आणि रशियामधील संबध कधीही खराब नव्हते. यामध्ये काही बदल झाले आहेत अस मला वाटतं. ही परिषद फक्त सुरुवात आहे या पुढेही दोन्ही देशाचे संबध चांगले रहातील.” – डोनाल्ड ट्रम्प

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -