घरदेश-विदेशCoronaVirus: कोरोनाविरोधातील लढ्यात नागरी प्रशासनाच्या मदतीला सैन्य दल

CoronaVirus: कोरोनाविरोधातील लढ्यात नागरी प्रशासनाच्या मदतीला सैन्य दल

Subscribe

मुंबई, जैसलमेर, हिंडन, जोधपुर, मानेसर आणि चेन्नई या सहा ठिकाणी लष्कर विलगीकरण सुविधा देत आहे

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी, गरजूंना वैद्यकीय आणि इतर सहाय्य करण्यासाठी सैन्य दल अथक मेहनत घेत आहे. या खडतर काळात नागरी प्रशासनाच्या समवेत लष्कराने आपल्या वैद्यकीय सेवा सज्ज केल्या आहेत. त्याचबरोबर परदेशातील भारतीय नागरिकांना सहकार्य करत आहे. मुंबई, जैसलमेर, हिंडन, जोधपुर, मानेसर आणि चेन्नई या सहा ठिकाणी लष्कर विलगीकरण सुविधा देत आहे. यामध्ये १७३७ जणांना ठेवले, असून, त्यापैकी ४०३ जणांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. याशिवाय अशा १५ सुविधाही लष्कराने सज्ज ठेवल्या आहेत. फक्त कोरोनावर उपचार करण्यासाठी कोलकत्ता, विशाखापट्टनम, कोची, बेंगळूरू, कानपूर, जैसलमेर, गोरखपूर येथील लष्कराच्या ५१ हॉस्पिटलमध्ये अति दक्षता विभाग, हाय डीपेडन्सी युनिटसह इतर सुविधा तयार ठेवल्या आहेत.


TikTok – केवळ मनोरंजन नाही तर कोरोनाशी लढण्यासाठी केली आर्थिक मदत!

कोविड-19 चे निदान करण्यासाठीच्या चाचण्या करू शकतील अशा दिल्ली, बंगळूरू, पुणे, लखनौ आणि उधमपूर येथील लष्कराच्या पाच प्रयोगशाळा राष्ट्रीय ग्रीडमध्ये सहभागी केल्या आहेत. यामध्ये आणखी सहा रुग्णालयांतल्या प्रयोगशाळांची भर पडणार आहे. त्याचप्रमाणे भारतीय हवाई दलाच्या विमानांचा ताफा, आवश्यक वस्तू, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांची ने- आण करण्यासाठी उपयोगात आणण्यात येत आहे. आतापर्यंत देशाच्या विविध भागात सुमारे ६० टन वजनाचा साठा पोहोचवण्यात आला आहे. २८ विमाने आणि २१ हेलीकॉपटर देशाच्या विविध भागात सज्ज ठेवण्यात आली आहेत.

- Advertisement -

अन्य राष्ट्रनाही मदत

भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानांनी परदेशात अडकलेल्या लोकांची सुटका करण्याबरोबरच वैद्यकीय सहाय्यही केले. ए सी -१७ ग्लोबमास्टर ३ द्वारा चीनला १५ टन वैद्यकीय सहाय्य पुरवले, परतताना ५ बालकांसह १२५ भारतीय नागरिक आणि मित्र राष्ट्रांच्या काही नागरिकांना आणले. इराणमध्ये अडकलेल्या ५८ भारतीयांची सुटका केली. सुपर हर्क्युलस विमानाने मालदीवला ६.२ टन औषधे पुरवली. शेजारी राष्ट्रांच्या मदतीसाठी नौदलाची सहा जहाजे सज्ज ठेवली आहेत. मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, नेपाल, भूतान आणि अफगाणिस्तान इथे तैनात करण्यासाठी पाच वैद्यकीय पथकेही सज्ज आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -