घरताज्या घडामोडीCoronaVirus: चौदा तबलीगांना दिला आश्रय; पाच ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल

CoronaVirus: चौदा तबलीगांना दिला आश्रय; पाच ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

संगमनेरमध्ये नेपाळच्या सर्वांना होम क्वारंटाईन केले.

संगमनेरमध्ये नेपाळच्या तबलीग जमातीच्या चौदा लोकांना आश्रय दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तबलीग जमातीच्या मोमीनपुरा येथील मरकद मशिदीच्या पाच ट्रस्टींविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे लॉकडाऊनच्या काळात प्रवेशबंदी असताना हे लोक संगमनेरमध्ये आले कसे?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्वांची रुग्णालयात तपासणी करण्यात आली असून त्यांच्या हातावर शिक्के मारुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

संगमनेरमध्ये लॉकडाऊनचे सर्रास उल्लघंन

कोरोना विषाणुचा वाढता फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्या-राज्याच्या, जिल्ह्यांच्या, तालुक्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. खबरदारी म्हणून लोकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यास आला आहे. मात्र संगमनेरमध्ये याचे सर्रासपणे उल्लंघन होत असताना आता परदेशी नागरिकांना थारा दिल्याचा प्रकारदेखील समोर आला आहे. परदेशी नागरिकांसदर्भातच नव्हे तर परराज्यातील नागरिकांसदर्भात माहिती देण्याचे बंधन असताना देखील गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये नेपाळ आणि राज्यातील चौदा नागरिक दडून बसले होते. मात्र याची कोणतीही माहिती प्रशासनाला देण्यात आली नव्हती.

- Advertisement -

जेथून ताब्यात घेतले तेथेच क्वारंटाईन

संगमनेरमध्ये चार कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील तिघे जामखेडमध्ये झालेल्या जमातीच्या कार्यक्रमात परदेशी नागरिकांसोबत सहभागी होते. तर एकाचे नाशिक कनेक्शन सापडले आहे. त्यामुळे सतर्क झालेल्या प्रशासनाने संगमनेरमध्ये परदेशी नागरिकांचा शोध सुरू केला असता रहेमतनगरमध्ये अमजद इब्राहिम शेख यांच्या बिल्डींगमधील दोन फ्लॅटमध्ये काही परदेशी लोक वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी बुधवारी येथे कारवाई करत चौदा नेपाळच्या तबलीग जमातीतील नागरिकांना ताब्यात घेतले. संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारुन त्यांना जेथून ताब्यात घेतले तेथेच क्वारंटाईन करून ठेवण्यात आले.

घटनेमुळे संगमनेरात खळबळ

संगमनेरमध्ये जमातीसाठी आलेल्या या नागरिकांना आश्रय दिल्याच्या कारणावरुन मोमीनपुरा येथील तबलीग समाजाच्या मरकत मशिदीचे ट्रस्टी हाजी जलीमखान कासमखान पठाण, हाजी शेख जियाउद्दीन अमीन, जैनुद्दीन हुसेन परावे, हाजी इमाम जैनुद्दीन मोमीन आणि शेख रिजवान गुलामनबी मोमीन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौदा जणांसह मोमीनपुरा भागातील पाच जणांची आणि त्यांच्या कुटूंबियांची देखील तपासणी करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी दिली. दरम्यान या घटनेमुळे संगमनेरात खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -