घरताज्या घडामोडीCorona Vaccine: दोन वेगवेगळ्या लसींना एकत्र करून बनवली एक लस; ट्रायलमध्ये झाला...

Corona Vaccine: दोन वेगवेगळ्या लसींना एकत्र करून बनवली एक लस; ट्रायलमध्ये झाला असा असर

Subscribe

जगभरात सध्या कोरोना विरोधात जोरदार लढाई सुरू आहे. या लढाईत कोरोना लस ही महत्त्वाची अस्त्र आहे. यादरम्यान आता वैज्ञानिकांनी दोन लसींना एकत्र करून एक नवीन लस तयार केली आहे. ही लस कोरोना विरोधात चांगली प्रतिकारशक्ती निर्माण करते असे समोर आले आहे. सुरुवातीला लसीच्या ट्रायलमध्ये ६०० लोकांना कोरोना देण्यात आली असून या ट्रायलचा अहवाल चांगला आला आहे. त्यामुळे वैज्ञानिकांनी नेमक्या कोणत्या दोन लसी एकत्र करून एक लस तयार केली? तसेच या नव्या लसीचा कोरोना लढाईत किती फायदा होतो? हे पाहूयात

संपूर्ण जगभरात ऑक्सफोर्ड-एस्ट्रोजेनेका (Oxford-AstraZeneca) आणि फायझर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech) या दोन्ही लसी कोरोनापासून बचाव करण्यासाठी मदत करत आहेत. कोरोनाविरोधात चांगली प्रतिकारशक्ती विकसित करत आहेत. त्यामुळे स्पेनमधील वैज्ञानिकांनी या दोन्ही लस एकत्र करून एक लस तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. या नव्या लसीच्या ट्रायलमध्ये खूप चांगला परिणाम दिसून आला आहे. ६०० लोकांवर ही नवी लस म्हणजेच मिक्स अँड मॅच (Mix-and-Match Vaccine) लसीची चाचणी केली आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात मिक्स अँड मॅच लसीचे ट्रायल झाले होते. सुरक्षित असल्याचा डेटा गेल्या आठवड्यात जारी करण्यात आला होता. आता प्रतिकारशक्ती वाढवण्यासंदर्भातील पुढील डेटा लवकरच जारी करण्याची शक्यता आहे. दरम्यान मिक्स अँड मॅच लसीचा डोस दोन लसीच्या डोसपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

कॅनडाचे हॅमिल्टन स्थित मॅक्मास्टर युनिव्हर्सिटीचे इम्युनोलॉजिस्ट झोउ जिंग यांनी सांगितले की, ‘एस्ट्राजेनेका लसीचा पहिला डोस घेणाऱ्या शरीरात फायझरच्या लसीचा दुसरा डोस दिल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती आणखी मजबूत होते.’ स्पेनममधील झालेल्या मिस्क अँड मॅच लसीच्या ट्रायल्स कॉम्बीवॅक्समध्ये ६६३ लोकं सामील होते. या सर्वांना ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाच्या लसीचा पहिला डोस दिला गेला होता. ही लस चिंपाझीच्या शरीरात मिळालेल्या एडिनोव्हायरसपासून तयार केली आहे. शरीरात या लसीचा कोणताही दुष्परिणाम होत नाही.

दरम्यान वैज्ञानिकांनी ६६३ लोकांमध्ये दोन तृतीयांश लोकं निवडले. त्यांना फायझरच्या लसीचा दुसरा डोस दिला. ही ट्रायल न्यूयॉर्क आणि जर्मनीमध्येही केली होती. ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाच्या लसीचा पहिला डोस घेतल्याच्या ८ आठवड्यानंतर फायझर लसीचा डोस देण्यात आला. २३२ लोकांना कंट्रोल्ड ग्रुपमध्ये ठेवले होते, या लोकांना बूस्टर डोस नाही दिले गेले आहेत. हा अभ्यास मॅड्रिक स्थित कार्लोस-२ हेल्थ इंन्स्टिट्यूटमध्ये केला आहे.


हेही वाचा – Covid-19: एक कोरोनाग्रस्त महिन्याभरात ४०६ जणांना संसर्ग पसरवतो, आरोग्य मंत्रालयाची माहिती


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -