घरदेश-विदेशरेल्वेला मिळणार नवा वेग; एका वर्षात होणार 1.5 लाखांची पद भरती

रेल्वेला मिळणार नवा वेग; एका वर्षात होणार 1.5 लाखांची पद भरती

Subscribe

भारतीय रेल्वेने रेल्वे पद भरती संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने तांत्रिक विकासासह अत्यावश्य पदे काढून टाकण्याबरोबरचं पुढील वर्षी 1,48,463 लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 18 महिन्यांत सर्व सरकारी विभाग आणि मंत्रालयांमध्ये 10 लाख लोकांची भरती करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशानंतर रेल्वेचे हे पाऊल उचलले आहे. रेल्वेने 2014-15 ते 2021-22 पर्यंत एकूण 3,49,422 लोकांना नोकऱ्या दिल्याची माहिती दिली आहे. ज्यांची वार्षिक सरासरी 43,678 होती. यानंतर रेल्वे 2022-23 या वर्षात 1,48,463 लाखांची पद भरती करणार आहे.

एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, रेल्वेने गेल्या सहा वर्षांत 72,000 हून अधिक अनावश्यक पद रद्द केली. रेल्वेच्या अनेक विभागांतील 81,000 पदे रद्द करण्याचा प्रस्ताव होता. रेल्वेने रद्द केलेली सर्व पदे ग्रुप सी आणि डी पदांमधील होते. रेल्वेमध्ये सातत्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने ही सर्व पदे आता निरुपयोगी ठरत होती. त्यामुळे रेल्वेही ही पदं रद्द केली.

- Advertisement -

तर भविष्यातही या पदांवरील भरती पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. सध्या अशा पदांवर काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या वेगवेगळ्या विभागात सामावून घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रेल्वेचे कामकाजातील आधुनिकीकरण आणि डिजिटलायजेशनमुळे ही सर्व पदे रद्द करावी लागल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. उत्तर रेल्वेने 9,000 हून अधिक पदे तर दक्षिण पूर्व रेल्वेने सुमारे 4,677 पदे रद्द केली आहेत. याशिवाय दक्षिण रेल्वेने 7,524 आणि पूर्व रेल्वेने 5,700 हून अधिक पदे रद्द केली आहेत. देशातील सरकारी नोकऱ्यांमध्ये रेल्वेचा वाटा सर्वात जास्त आहे. केंद्रशासित प्रदेश वगळून केंद्र सरकारच्या 31.33 लाख कर्मचाऱ्यांमध्ये रेल्वेचा वाटा 40.55 टक्के आहे.


पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; काँग्रेस माजी शहराध्यक्ष शेख हुसेनांविरोधात तक्रार दाखल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -