घरताज्या घडामोडीजनसेवा करण्यासाठी १४ दिवसांच्या नवजात बाळासह IAS Officer कार्यालयात रुजू

जनसेवा करण्यासाठी १४ दिवसांच्या नवजात बाळासह IAS Officer कार्यालयात रुजू

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. पण ६३ दिवसांनंतर देशात पहिल्यांदा नव्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. या कोरोनाच्या संकट काळात डॉक्टर, नर्सेस, पोलीस कर्मचारी व्यतिरिक्त इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी देखील अहोरात्र काम करत असतात. कोरोनाच्या या संकटात अनेक महिला आपल्या घरातील चुलं-मूलं सांभाळून आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. दरम्यान कोरोना काळातील आपली जबाबदारी ओळखून १४ दिवसांच्या बाळासह आयएएस अधिकारी कार्यालयात हजर झाल्या आहेत. सध्या या महिला आयएएस अधिकाऱ्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या कर्तव्यदक्ष कामामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

- Advertisement -

सौम्या पांडेय असे या महिला आयएएस अधिकाऱ्यांचे नाव आहे. नवजात बाळासह ऑफिसमध्ये फाईल्स हाताळताना सौम्या पांडेय यांचा फोटो व्हायरल होत आहे. सौम्या पांडे मुळच्या प्रयागराज येथील आहेत. त्यांची गाझियाबादमध्ये पहिलीच नियुक्ती आहे. त्यांनी १४ दिवसापूर्वी एका चिमुकलीला जन्म दिला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सौम्या पांडेय यांनी आपला कार्यभार पुन्हा हाती घेतला. मोदीनगर तहसीलमधील एसडीएम सौम्या पांडेय यांनी आपल्या मुलीला घेऊनच जनसेवा करण्यासाठी कार्यालयात हजर राहिल्या आहेत.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना सौम्या पांडेय म्हणाल्या की, ‘अशाप्रकारची कामं महिला आधीपासूनचं करत आहेत. अनेक महिल्या अधिकारी आपल्या कुटुंबासोबत, शासकीय सेवेत कार्य करत आहेत. माझ्या मुलीला ऑफिसमध्ये घेऊन जाण्यासाठी मला कुटुंबाचा खूप पाठिंबा आहे. कोरोनाच्या या परिस्थितीत अधिकाऱ्यांनं कार्यालयात हजर असणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे घरातील सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठी आधी स्वतःला आणि त्यानंतर सर्व फाईल्सना सॅनिटाईज कराव्या लागतात. माझ्या मुलीसह सर्व लोकांची काळजी घेणं, ही माझी जबाबदारी आहे.’

- Advertisement -

हेही वाचा – बॅडन्यूज! यामुळे जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनने थांबवल्या कोरोना लसीच्या चाचण्या!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -