घरदेश-विदेशकेरळमध्ये दोन दिवसआधीच मान्सूनची हजेरी

केरळमध्ये दोन दिवसआधीच मान्सूनची हजेरी

Subscribe

शनिवारी केरळच्या समुद्रकिनारी मान्सून दाखल झाल्याचा दावा स्कायमेटने केला आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची माहिती स्कायमेट वेदरने दिली असून केरळमध्ये मान्सून १ जून रोजी दाखल होणार, असा अंदाज असताना आजच शनिवारी केरळच्या समुद्रकिनारी मान्सून दाखल झाल्याचा दावा स्कायमेटने केला आहे. स्कायमेट वेदर ही हवामानाचा अंदाज वर्तवणारी खासगी संस्था आहे. या संस्थेने यासंदर्भात ट्वीट करुन माहिती देखील दिली आहे.

- Advertisement -

मान्सून आपल्या निर्धारित वेळेच्या आधी म्हणजेच ३० मे रोजीच केरळमध्ये दाखल झाला आहे. पाऊस, ओएलआर व्हॅल्यू, हवेचा वेग इत्यादी अनुकूल आहेत, असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानमध्ये रेड अलर्ट जारी केला होता. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, २९ मे नंतर कडाक्याच्या उन्हापासून सुटका होऊन थोडा दिलासा मिळण्याची शक्यता असे देखील सांगण्यात आले होते.

- Advertisement -

याआधी मान्सून १ जून रोजी केरळच्या समुद्रकिनारी दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला होता. परंतु आयएमडीने गुरुवारी या अंदाजात बदल करत, सध्याची परिस्थिती मान्सूनच्या आगमनासाठी अनुकून आहे. परंतु केरळमध्ये मान्सून ५ जून रोजी दाखल होईल, असेही म्हटले होते मात्र त्याआधीच मान्सूननी हजेरी लावल्याचे बघायला मिळाले.

दरम्यान, स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मान्सून २८ मे रोजी दाखल होईल असे सांगितले होते. तर यामध्ये दोन दिवस आधी किंवा दोन दिवस नंतर असा फरक असेल, असेही म्हटले होते.


पुढचे २-३ दिवस कडाक्याचे; २९ मे पासून सुरू होणार पाऊस!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -