घरताज्या घडामोडीकोणाचं काय तर कोणाचं काय, ट्रम्प यांच्यासाठी 'हा' करतोय शुक्रवारचे उपवास

कोणाचं काय तर कोणाचं काय, ट्रम्प यांच्यासाठी ‘हा’ करतोय शुक्रवारचे उपवास

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प २३ फेब्रुवारीला सपत्नीक भारत भेटीस येत आहेत. यामुळे सरकारी यंत्रणा ट्रम्प यांच्या स्वागताच्या तयारीला लागली आहे. याचवेळी तेलंगणामध्येही ट्र्म्प यांच्या स्वागतासाठी एकजण आतुरलेला असल्याचे समोर आले आहे. बुसा कृष्णा असे त्याचे नाव असून तो ट्रम्प यांच्या मोठा चाहता आहे. ट्र्म्प यांच्यामागे कुठलेही शुक्लकाष्ठ लागू नये, त्यांना नजर लागू नये म्हणून बुसा दर शुक्रवारी उपास करतो. एवढेच नाही तर त्याने घराच्या अंगणात ट्रम्प यांचा ६ फुटांचा पुतळा उभारला आहे. ट्रम्प यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या चाहत्याला ट्र्म्प यांना भेटण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी त्याने भारत सरकारला पत्रही लिहले आहे.

याबद्दल बुसाला विचारले असता त्याने सांगितले कि मी ट्र्म्प यांचा चाहता आहे. भारत व अमेरिकेचे संबंध कायम मजबूत राहावेत यासाठी मी शुक्रवारी उपवास करतो. त्यांचा फोटोही मी जवळ ठेवतो. कुठल्याही कामाचा शुभारंभ करण्यापूर्वी मी ट्रम्प यांच्या फोटोला व पुतळ्याला नमन करतो. यामुळे त्यांना भेटण्याची माझी इच्छा असून सरकारने माझी ही इच्छा पूर्ण करावी अशी मी विनंती करत असल्याचे त्याने सांगितले आहे.

- Advertisement -

बुसा हा ट्र्म्प यांचा नुसताच चाहता नसून तो त्यांचा भक्तही आहे. त्यामुळे त्याने अंगणात ट्रम्प यांचा पुतळा उभारला आहे. हा पुतळा उभारण्यासाठी तब्बल एक महिना लागला असून १५ मजदूरांनी हा पुतळा तयार केला आहे. एवढेच नाही तर बुसाचे ट्र्म्प प्रेम बघून त्याच्या निवासस्थानाला ग्रामस्थांनी ट्र्म्प हाऊस नाव दिले आहे. त्याच्या या ट्रम्पभक्तीवर ग्रामस्थांचा आक्षेप नसून मोदी सरकारने बुसा आणि ट्र्म्प यांची भेट करून द्यावी अशी मागणी त्यांनीही केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -