घरदेश-विदेशस्वबळाची भाषा आली अंगलट, २४ तासांच्या आत २१ आमदारांनी सोडला पक्ष

स्वबळाची भाषा आली अंगलट, २४ तासांच्या आत २१ आमदारांनी सोडला पक्ष

Subscribe

राजकारणात अनेक राजकीय पक्ष स्वबळाची भाषा करत असतात. मात्र, हीच स्वबळाची भाषा नागा पीपल्स फ्रंटच्या अंगाशी आली आहे. नागालँडच्या राजकारणात मध्यरात्री मोठी घडामोड घडली. रातोरात नागा पीपल्स फ्रंटच्या २१ आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. यानंतर या सर्व आमदारांनी नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या उपस्थितीत नॅशनल डेमोक्रॅटीक प्रोगेसिव्ह पक्षात प्रवेश केला.

नागालँडमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान, २१ आमदारांच्या सोडचिठ्ठीनंतर विधानसभेत नागा पीपल्स फ्रंटचे ४ आमदार आहेत. तर भाजपचे १२ आणि २ अपक्ष आमदार आहेत. विशेष म्हणजे हे सर्वच आमदार सरकारमध्ये सहभागी असून एकही आमदार विरोधी पक्षात नाही आहे. नागा पीपल्स फ्रंट मागील वर्षी ऑगस्टमध्ये नॅशनल डेमोक्रॅटीक प्रोगेसिव्ह पक्ष आणि भाजपप्रणीत सत्तेत सहभागी झाला आहे. त्यानंतर आता राज्यात पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत, आणि अवघ्या काही तासांपूर्वीच एनपीएफने या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे घोषित केलं आहे.

- Advertisement -

आमदारांचा NDPP मध्ये विलीनीकरण करण्याचा दावा विधानसभा अध्यक्षांकडे पोहोचला

नागा पीपल्स फ्रंटच्या विधिमंडळ पक्षाच्या २१ आमदाराचा एनडीपीपीमध्ये विलीनीकरण करण्याचा दावा प्राप्त झाला आहे. तसेच हा निर्णय आपण मान्य केला आहे, अशी माहिती नागालँड विधानसभेचे अध्यक्ष शेरिंगेन लाँगकुमार यांनी दिली. एनडीएफ पक्षाचे ५ आमदार नागालँडशिवाय मणिपूरमध्येही ५ आमदार असून ते भाजपसह सत्तेत सहभागी आहेत. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये १२ पैकी २ मंत्री एनडीएफ पक्षाचे आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -