घरमनोरंजनRam Setu सिनेमाच्या पोस्टरमुळे Akshay Kumar ट्रोल; मशालीमागचे लॉजिक काय? चाहत्यांचा सवाल

Ram Setu सिनेमाच्या पोस्टरमुळे Akshay Kumar ट्रोल; मशालीमागचे लॉजिक काय? चाहत्यांचा सवाल

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आला आहे. अक्षय कधी तंबाखू ब्रँडच्या जाहिरातीमुळे तर कधी चित्रपटाच्या पोस्टरवरून ट्रोल होत आहे. अभिनेत्याला आता राम सेतू चित्रपटाच्या नुकत्याच लाँच झालेल्या पोस्टरवरून ट्रोल केले जातेय.

अक्षय कुमारने अलीकडेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून राम सेतू चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. ज्यामध्ये अक्षय कुमारसोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि एक व्यक्ती दिसली होती. राम सेतूच्या या पोस्टरमध्ये अक्षय कुमारने हातात एक जळती मशाल धरलेली दिसतेय. तर जॅकलीनच्या हातात टॉर्च आहे. या पोस्टरवरून तरी ते कोणत्या तरी रहस्याचा शोध घेत असल्याचे जाणवतेय. पोस्टरमधील हे तिन्ही कॅरेक्टर्स इंटेन्स लूक देताना दिसले. हा पोस्टर रिलीज होतात सोशल मीडियावर व्हायरल झाला.

- Advertisement -

अक्षय कुमारची एखादी गोष्ट व्हायरल झाली आणि त्यावर ट्रोलर्सची प्रतिक्रिया नाही आली असं कधी होणार का? अक्षय कुमारच्या राम सेतु सिनेमाच्या पोस्टरवर देखील ट्रोर्ल्सनी आक्षेप घेतला आहे. या पोस्टरमागचे लॉजिकचं चाहत्यांना समजले नाही. जॅकलीनप्रमाणे अक्षयला देखील टॉर्च सहज वापरता आली असती मग त्याने हातात मशाल का घेतली आहे. असे युजर्सचे म्हणण आहे. त्यामुळे पोस्टरवरू युजर्स अक्षय कुमारची खिल्ली उडवत आहेत. एका युजरने लिहिले की, जॅकलिनकडे बॅटरी ऑपरेटेड फ्लॅशलाइट आहे. तरीही अक्षय मशाल घेऊन आहे. हा फोटो डायरेक्शनचे बारकावे सांगते.

- Advertisement -

रामसेतू हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भरुचा दिसणार आहेत. अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ हा चित्रपटही सध्या चर्चेत आहे. राम सेतू रिलीज होण्याआधी ज्या प्रकारे चित्रपटाला ट्रोल केले जात आहे, ते पाहता या सीनबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया बदलतात की तशाच राहतात हे पाहावे लागेल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -