घरदेश-विदेशराजपथ बनला 'कर्तव्यपथ', NDMCच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर

राजपथ बनला ‘कर्तव्यपथ’, NDMCच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर

Subscribe

नवी दिल्ली – राजपथ या नावाने प्रसिद्ध असलेल्या इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या रस्त्याला आता राजपथ असे नाव देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राजपथसह नव्याने बांधलेल्या सेंट्रल व्हिस्टा लॉनचेही नामांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव नवी दिल्ली नगरपरिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

NDMC च्या बैठकीत प्रस्तावाला मंजूर –

- Advertisement -

राजपथचे नाव बदलून ‘कर्तव्य पथ’ ठेवण्याचा प्रस्ताव बुधवारी नवी दिल्ली नगरपरिषदेच्या (NDMC) बैठकीत मंजूर करण्यात आला. लोकसभा खासदार आणि NDMC सदस्य मीनाक्षी लेखी यांनी सांगितले की NDMC कौन्सिलच्या विशेष बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. आम्ही आजच्या विशेष परिषदेच्या बैठकीत राजपथचे नाव बदलून कर्तव्य पथ ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

असा असेल कर्तव्य पथ –

- Advertisement -

दिल्लीच्या राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनला नवे नाव देण्यात येणार आहे. आता त्याचे नाव ‘कर्तव्‍य पथ’ असे ठेवले जाईल. त्याच वेळी, राजपथच्या बाजूने सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूमध्ये राज्यनिहाय खाद्यपदार्थांचे स्टॉल, चहूबाजूंनी हिरवेगार असलेले लाल ग्रेनाइट मार्ग,  वेंडिंग जोन, पार्किंग स्थळ आणि चोवीस तास सुरक्षा असेल. मात्र, लोकांना फक्त इंडिया गेटपासून मानसिंग रोडपर्यंत पार्क परिसरात खाद्य पदार्थ खाण्यास परवानगी नासेल. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग म्हणून विजय चौक ते इंडिया गेटपर्यंतच्या संपूर्ण मार्गाचे 8 सप्टेंबर रोजी संध्याकाळी उद्घाटन करतील.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -