घरताज्या घडामोडीNEET - JEE परिक्षा पुढे न ढकलता वेळेतच होणार; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

NEET – JEE परिक्षा पुढे न ढकलता वेळेतच होणार; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Subscribe

NEET आणि JEE परिक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यासोबतच परिक्षा घेण्यासाठी आता कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने मेडिकल प्रवेशासाठी NEET आणि इंजिनियरिंग प्रवेशासाठी JEE Mains परिक्षा स्थगित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेला धुडकावून लावले. सप्टेंबर महिन्यात या परिक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.

ही याचिका फेटाळून लावत असताना सु्प्रीम कोर्टाने सांगितले की, कोरोनामुळे देशात सर्व काही रोखून धरायला हवे का? विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे एक वर्ष वाया का जाऊ द्यायचे?. या याचिकेमध्ये कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर NEET आणि JEE परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती.

- Advertisement -

१ ते ६ सप्टेंबर दरम्यान JEE ची परिक्षा आयोजित करण्यात येणार होती. तर NEET परिक्षा १३ सप्टेंबरपासून आयोजित करण्याचा विचार होता. ही परिक्षा स्थगित करण्याच्या मागणीसाठी ११ राज्यातील ११ विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -