घरताज्या घडामोडी'या' दिवशी १४ तासांसाठी NEFTमनी ट्रान्सफर सर्व्हिस राहणार बंद, जाणून घ्या कारण

‘या’ दिवशी १४ तासांसाठी NEFTमनी ट्रान्सफर सर्व्हिस राहणार बंद, जाणून घ्या कारण

Subscribe

NEFT सर्व्हिसची कार्यक्षमता आणि नियमन सुधारण्यासाठी टेक्निकल अपग्रेड केले जाणार

NEFT सेवा सर्वांसाठी महत्त्वाची आणि सोपी आहे. मात्र RBIने NEFT सर्व्हिस संबंधी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. दिनांक २३ मे रोजी NEFT सर्व्हिस तब्बल १४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यासंबंधीची माहिती RBIने ट्विट वरुन दिली आहे. २३मे ला रात्री १२ ते २४ मे दुपारी २ वाजेतपर्यंत NEFT सर्व्हिस बंद ठेवण्यात येईल, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. RBIच्या म्हणण्यानुसार,NEFTची प्रोसेस ग्राहकांना आणखी सुलभ करण्यासाठी एक दिवस सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. या दिवसात NEFT सर्व्हिसची कार्यक्षमता आणि नियमन सुधारण्यासाठी टेक्निकल अपग्रेड केले जाणार आहे. या अपग्रेडमुळे NEFTचा उपयोग करणाऱ्या ग्राहकांना आणखी सुलभ सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे जर २३ मे रोजी तुम्ही NEFT द्वारे पैसे ट्रान्सफर करणार असाल तर थोडा वेळ थांबणे तुमच्या हिताचे ठरेल.(NEFT Money Transfer Service will be closed for 14 hours in 23 may)

रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२१-२२मध्ये नॉन बँक पेमेंट संस्थांसाठी RTGD आणि NEFT सदस्यत्वासाठी परवानगी दिली आहे. त्यासाठी आता बँकेची गरज लागणार नाही. आरबीआयच्या या प्रस्तावामुळे आता पीपीआय,कार्ड नेटवर्क, वाइड लेव्हस एटीएम ऑपरेटर हे नॉन बँक पेमेंटही मध्यवर्ती बँकेमधूनही संचालित RTGS आणि NEFTचे सदस्यत्व घेऊ शकतील.

- Advertisement -

रविवारी NEFT सर्व्हिस पूर्णपणे बंद राहणार असल्याने कोणतीही रक्कम ट्रान्सफर बँक ग्राहकांद्वारे वापरण्यास उपलब्ध होणार नाही. परंतु RTGS सर्व्हिस या काळात पूर्णवेळ कार्यरत राहणार आहे. RTGS संबंधी टेक्निकल अपग्रेड १८ मे रोजी पूर्ण करण्यात आले आहेत. पैसे ट्रान्सफर करण्याव्यतिरिक्त NEFT सर्व्हिसचा वापर विविध बँकांसाठी केला जातो. बँकाना क्रेडिट कार्डची थकबाकी भरणे,EMIभरणे, परकिय चलन पाठविण्यासाठीही NEFT सव्हिसचा वापर केला जातो.


हेही वाचा – केवळ ३३० रुपये वार्षिक प्रीमियम भर मिळवा 2 लाखांचा विमा, जाणून घ्या मोदी सरकारची योजना

- Advertisement -

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -