घरदेश-विदेश'प्रभू रामचंद्र भारतीय नव्हे, ते तर नेपाळी'; पंतप्रधानांचा दावा

‘प्रभू रामचंद्र भारतीय नव्हे, ते तर नेपाळी’; पंतप्रधानांचा दावा

Subscribe

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी प्रभू रामचंद्रासंबंधीचा वेगळाच शोध लावला आहे. रामाची जन्मभूमी अयोध्या ही नेपाळमध्ये असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच श्री राम हे भारतीय नसून नेपाळी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

काय म्हणाले पंतप्रधान ओली

राजपुत्र असलेल्या रामाला आम्ही सीता दिली, असे आम्ही आजही मानतो. मात्र काही भारतात असलेल्या अयोध्येच्या राजकुमाराला सीता दिली नाही. अयोध्या नावाच गाव बीरगंजच्या पश्चिमेला आहे. मात्र भारतातील अयोध्या खरीखुरी नाही. भारतातील अयोध्या खरी असेल तर मग तेथील राजकुमार लग्नासाठी जनकपूरला कसा येऊ शकतो, अस प्रश्न पंतप्रधान ओली यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान के पी शर्मा ओली हे सातत्याने भारताविरोधी भूमिका घेत असून त्यामुळे अडचणीतही येत आहेत. त्यांचे पंतप्रधानपद धोक्यात आले असून ते टिकवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता त्यांनी थेट भारतावर आरोप केला आहे. कवी भानुभक्त आचार्य जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ओली यांनी नेपाळवर सांस्कृतिक अत्याचार करण्यात आले असून ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्यात आल्याचे वक्तव्य केले.

- Advertisement -

हेही वाचा –

धक्कादायक! सावकाराच्या तगाला कंटाळलेल्या कुटुंबाने संपवले आयुष्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -