लसीकरणावर विश्वास ठेवा म्हणत कमला हॅरिस यांनी टोचून घेतली कोरोनाची लस

newly elected us vice president kamla harris get first shot corona vaccine
कमला हॅरिस यांनी टोचून घेतली कोरोनाची लस

अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांनी मंगळवारी लाईव्ह टीव्हीवर कोरोनाची लस टोचून घेतली. कमला हॅरीस यांना मॉडर्नाची लस टोचण्यात आली आहे. वॉशिंग्टन डीसीमधील युनायटेड मेडीकल सेंटरमध्ये कमला हॅरिस यांनी लस टोचून घेतली. लस टोचून घेताना कमला हॅरीस यांनी लसीकरणावर विश्वास ठेवा, असं आवाहन केलं.

लसीचा पहिला डोस घेण्यापूर्वी कमला हॅरिस म्हणाल्या, मी तयार आहे, तुम्ही लसीकरण प्रक्रिया सुरू करा. ही लस घेतल्यानंतर बोलताना कमला हरीसा म्हणाल्या की हे खूप सोपं आहे. विशेष म्हणजे कोरोनाला रोखण्यासाठी अमेरिकेत लसीकरण सुरू झालं आहे. अमेरिकेला कोरोना साथीचा सर्वाधिक त्रास झाला आहे. जगात सर्वाधिक मृत्यू आणि कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण अमेरिकेतच आहे.

दरम्यान, कमला हॅरिस यांच्या आधी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीरपणे कोरोनाची लस टोचून घेतली. यानंतर प्रतिक्रिया देताना बायडेन म्हणाले, मला ही लस घेण्याची घाई नव्हती, परंतु हे करून मी देशवासीयांना खात्री देऊ इच्छितो की लस पूर्णपणे सुरक्षित आहे. बायडेन आणि त्यांची पत्नीने ही लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचार्‍यांचे आभार मानले.

भारतीय-अमेरिकन वंशाच्या प्रथम महिला उपराष्ट्रपती बनणार

कमला हॅरिस २० जानेवारीला उपराष्ट्रपती पदावर विराजमान होणारी भारतीय-अमेरिकन असतील. याव्यतिरिक्त, त्या अमेरिकेची उपराष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या महिलाही असतील.