Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र दिलासा! राज्यात नव्या कोरोनाचा एकही रूग्ण नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे

दिलासा! राज्यात नव्या कोरोनाचा एकही रूग्ण नाही – आरोग्यमंत्री राजेश टोपे

नागरिकांना घाबरण्याचे कारण नाही, आरोग्यमंत्र्याचे आवाहन

Related Story

- Advertisement -

ब्रिटनहून भारतात परत आलेल्या एकूण २० प्रवाशांना कोरोनाची लागण झाली असून यांच्यात नवीन कोरोनाचा स्ट्रेन आढळल्याने देशाची चिंता वाढली आहे. दरम्यान, या नव्या व्हायरसचा देशात धोका असतानाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. यावेळी ते असे म्हणाले, युकेवरून आलेल्या सर्व प्रवाशांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी देण्यात आले. यापैकी ४३ जणांच्या स्वॅबची चाचणी करण्यात आली. दिलासादायक म्हणजे यापैकी एकाही व्यक्तीला नव्या कोरोनाची लागण झालेली नसल्याने ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनचा महाराष्ट्रात एकही रूग्ण नाही.

ब्रिटनहून भारतात परतलेल्या सहा जणांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याने चिंता अधिक वाढली होती. महाराष्ट्रातही गेल्या महिन्याभरात ब्रिटनहून परतलेल्या प्रवाशांची संख्यादेखील अधिक होती. त्यामुळे आरोग्य प्रशासनानदेखील सतर्क झाले होते. मात्र, ‘ब्रिटनमधून आत्तापर्यंत महाराष्ट्रात आलेल्या ४३ प्रवाशांमध्ये कोरोनाचा एकही नव्या कोरोना स्ट्रेनचा पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही,’ असे आवाहनही त्यांनी केले आहे. यासह त्यांनी हे आवाहन करताना असेही सांगितले की, ब्रिटनमधून आलेले काही प्रवासी सापडत नाहीत. हा गंभीर विषय आहे. पोलिसांना या प्रवाशांना शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या प्रवाशांचा शोध सुरू आहे. या प्रवाशांनीही स्वत:हून आरोग्य यंत्रणेसमोर येऊन तपासणी करून घ्यावी.

- Advertisement -

युकेवरून येणाऱ्या सर्व फ्लाईट्स भारत सरकारने देखील बंद केल्या आहेत. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सर्वप्रथम युकेवरून येणाऱ्या फ्लाईट्स बंद करण्याचा निर्णय दिला आहे. यासह नव्या विषाणूवर आमचं संपूर्ण लक्ष आहे. युकेवरून येणाऱ्या सर्व प्रवासांची योग्य ती तपासणी करण्यात येत आहे. त्या प्रवाशांची स्वॅब तपासणी केली जात असून त्यांना क्वारंटाईनही केले जात आहे. नव्या कोरोना स्ट्रेनचा धोका राज्यात असल्याने राज्यात योग्य ती काळजी घेतली जात आहे, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.


राज्यात कोरोनाचा नवा म्युटंट नाही; राज्य सरकारची माहिती

- Advertisement -