घरदेश-विदेश'दारू पिणारे पापी, त्यांना मी हिंदुस्थानी मानत नाही' - नितीश कुमार

‘दारू पिणारे पापी, त्यांना मी हिंदुस्थानी मानत नाही’ – नितीश कुमार

Subscribe

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा दारूबंदीबाबत अजब विधान केले आहे. बुधवारी विधानसभेत आणले गेलेले मद्य बंदी दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले, ज्यामध्ये कोणीही पहिल्यांदा दारू पिताना पकडले तर त्याला दंड भरून सोडले जाऊ शकते. दारुबंदीच्या दुरुस्ती विधेयकावरून विधानसभेत जोरदार गदारोळ सुरू असतानाच, विधान परिषदेत दारूबंदीच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उभे राहून मोठे वक्तव्य केले.

जे दारूचे सेवन करतात आणि बापूंच्या मतांवर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना मी हिंदुस्थानी मानत नाही, असे नितीश कुमार म्हणाले. नितीश कुमार म्हणाले की, जे असे करतात ते अत्यंत अयोग्य आणि मोठे पापी आहेत. दारूचे सेवन कुठेही चांगले नाही. दारूबंदीमुळे महसुलाचे नुकसान होत असल्याचा युक्तिवाद करणारे ते चुकीचे आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्वी बिहारमध्ये दारू विकली जायची तेव्हा ५ हजार कोटी रुपयांचा महसूल यायचा, पण दारूबंदीनंतर लोकांना खूप फायदा झाला.

- Advertisement -

दारूबंदीमुळे भाजीपाला खप वाढला

नितीश कुमार म्हणाले की, जे पैसे लोक दारू पिण्यासाठी खर्च करायचे ते आता भाजीपाला खरेदीवर खर्च करतात. दारूबंदीनंतर भाजीपाल्याची विक्री वाढली, आता लोक घरी भाजी आणतात, ती निरोगी आहेत, असे नितीशकुमार यांनी विधान परिषदेत सांगितले.

आरजेडीचा टोमणा

शिवानंद तिवारी म्हणाले की, अप्रत्यक्षपणे नितीश कुमार आपल्या सहकाऱ्यांना पापी आणि नालायक म्हणत आहेत ज्यांच्या मदतीने ते गेली अनेक वर्षे सरकार चालवत आहेत. दारू पिणे हा गुन्हा नसलेल्या यूपी सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून नितीश कुमार नुकतेच परतले. यासोबतच गांधींची हत्या करणाऱ्यांना खरे देशभक्त मानणारे नितीशकुमार त्यांच्यासोबत राज्यकारभार चालवत आहेत, असा टोला शिवानंद तिवारी यांनी लगावला.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -