घरदेश-विदेशविलीनीकरणाच्या चर्चेत तथ्य नाही - शरद पवार

विलीनीकरणाच्या चर्चेत तथ्य नाही – शरद पवार

Subscribe

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भेट घेतल्यानंतर माध्यमांमध्ये एका वेगळयाच चर्चेला तोंड फुटले होते. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, असे बोलले जात होते. मात्र खुद्द शरद पवार यांनीच ही चर्चा फेटाळून लावली आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाल्यापासून राहुल गांधी काँग्रेसच्या नेत्यांना भेटत नव्हते. पण आज ते थेट शरद पवार यांच्या भेटीसाठी ६ जनपथवर पोहोचले त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले होते. मात्र या भेटीत दुष्काळ, आगामी विधानसभेच्या निवडणुका याबाबतच चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले.

तसेच मुंबईतही काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत राहुल गांधी यांनीच पुन्हा अध्यक्षपदी राहावे, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची माहिती अद्याप आपल्याला नाही. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये जी चर्चा झाली ती पुढील काळासाठी फायद्याची ठरेल.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -