घरताज्या घडामोडीImran Khan : इमरान खान यांच्या विरोधात पाकिस्तानच्या संसदेत अविश्वासाचा ठराव मांडला

Imran Khan : इमरान खान यांच्या विरोधात पाकिस्तानच्या संसदेत अविश्वासाचा ठराव मांडला

Subscribe

पाकिस्तानच्या संसदेत विरोधी पक्षाचे नेते शेबबाझ शरीफ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणल्याचा दावा पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी केला आहे. पंतप्रधान इमरान खान यांचे यानिमित्ताने काऊंटडाऊन सुरू झाल्याची चर्चा आहे. दोन दिवसांच्या अवकाशानंतर अत्यंत महत्वाच्या अशा सत्राची सुरूवात पाकिस्तानात झाली आहे. पाकिस्तानातील राजकीय संकटातच इमरान खान यांच्याविरोधात औपचारिक पद्धतीने विरोधी पक्षाने अविश्वासाचा ठराव मांडला आहे. त्यामुळे पाकिस्तानात मोठी राजकीय उलाढाल होण्याची चिन्हे आहेत.

पंतप्रधान इमरान खान यांच्याविरोधात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीतच देशातील विरोधी पक्षाने ८ मार्चला संसदेत नोटीस देत १४ दिवसांच्या आत अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. त्यामुळेच पाकिस्तानात राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विरोधी पक्षाने दिलेल्या डेडलाईन नंतर २५ मार्चला अधिवेशन बोलावण्यात आले होते. पण त्यावेळी अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी संसदेच्या अध्यक्षांनी नकार दिला होता. विरोधकांनी केलेल्या आरोपानुसार देशात मोठ्या आर्थिक संकटानंतर आणि वाढत्या महागाईला पंतप्रधान इमरान खान हेच जबाबदार आहे. त्यामुळेच या पदावर राहण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही.

- Advertisement -

बहुमताच्या आकड्याचे गणित

विरोधी पक्षाने गेल्या काही कालावधीत सातत्याने पंतप्रधान हटावाची मागणी केली होती. पण अविश्वास ठरावाच्या निमित्ताने विरोधी पक्षाला पहिल्यांदाच यश मिळताना दिसत आहे. याआधीच इमरान खान यांच्या बाजुने असणाऱ्या २४ खासदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. देशाच्या ३४२ संसदेत पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पार्टी (पीटीआय) चे १५५ सदस्य आहेत. तर सरकार टिकवून ठेवण्यासाठी इमरान खान सरकारला १७२ खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. पाकिस्तानातील सत्तेच्या समीकरणात सुरूवातीला १७६ खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात होता. पण २४ खासदारांनी इमरान खान यांची साथ सोडल्याचे समोर आले होते. आता इमरान खान यांच्यासोबत १५२ खासदारांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. पण देशाच्या संसदेत १७२ आकडा पार करण्यासाठी आणखी काही खासदारांची साथ त्यांना अपेक्षित आहे. विरोधकांनी केलेल्या दाव्यानुसार सरकार पाडण्यासाठी १७२ खासदारांचे समर्थन मिळू शकते. तर इमरान खान सरकारने केलेल्या दाव्यानुसार सदनात विरोधकांचा डाव उलटवण्यासाठी पुरेसा पाठिंबा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -