Vaccine Shortage : राज्यात कोवॅक्सिन, कोविशिल्डचा साठी किती ? केंद्राने दिले स्पष्टीकरण

Covid-19 How long after recovery can one take precaution dose Here’s what new guidelines say
Corona Vaccine : कोरोनातून बरे झाल्यानंतर किती महिन्यांनी घ्यावा डोस, केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स

लसीच्या तुटवड्यामुळे राज्यात लसीकरणाची गती वाढवणे शक्य नसल्याच्या वृत्तावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. आज उपलब्ध अहवालानुसार महाराष्ट्रात १४ जानेवारी २०२२ रोजी एकुण कोवॅक्सिन लसीच्या २४ लाखांपेक्षा जास्त मात्रा असल्याची माहिती केंद्राने स्पष्ट केली आहे. आज महाराष्ट्राला ६.३५ लाख अतिरिक्त लसीच्या मात्रा उपलब्ध झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या लसीच्या मागणीच्या कोविन एपवर असणाऱ्या आकडेवारीनुसार राज्यात १५ ते १७ वयोगटताली लाभार्थींना देण्यासाठी आणि बुस्टर डोससाठी अशी महाराष्ट्राची सध्या २.९४ लाख इतका दैनंदिन लसीचा वापर आहे. त्यामुळे पात्र लाभार्थींसाठी लस पुरवठा करण्यासाठी दहा दिवस पुरेल इतका साठा राज्याकडे असल्याची माहिती केंद्राकडून स्पष्ट करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कोविशिल्डचा वापर न झालेल्या लसीचा शिल्लक असा साठा १.२४ कोटी इतका आहे. दिवसाला ३.५७ लाख दैनंदिन लसीचा वापर विचारात घेतला तर राज्यातील लाभार्थींसाठी ३० दिवसांपेक्षा अधिक पुरेल इतका लसीचा साठा महाराष्ट्रात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त हे लसीच्या उपलब्ध साठ्याचे आणि वापर न झालेल्या लसीच्या मात्रांचे वास्तविक चित्र मांडत नाही, असा दावा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना लस आणि औषधांसह वाढीव निधी दिला आहे. त्यामुळे आता राज्यांना काम करण्याची गरज आहे. राज्य सरकारचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राने कामाची गती वाढवली पाहिजे, अशी टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केली होती. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सूचना देऊनही बैठकीला हजेरी लावली नाही.