घरताज्या घडामोडीAung San Suu Kyi : नोबेल विजेत्या आंग सान सू यांचे भारताचे...

Aung San Suu Kyi : नोबेल विजेत्या आंग सान सू यांचे भारताचे कनेक्शन काय?, कसा आहे राजकीय प्रवास?

Subscribe

म्यानमारच्या न्यायालयाने नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान सू यांनी लष्करीविरूद्धात असंतोष पसरवल्यामुळे आणि कोविड-१९ च्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांना चार वर्षासाठी तुरूंगाची शिक्षा देण्यात आली आहे. म्यानमारच्या सेनेद्वारे आंग सान सूच्या विरोधात अनेक प्रकरणांमध्ये हे एक प्रकरण आहे. याआधी १ फेब्रुवारीला म्यानमारच्या सैनिकांनी देशावर कब्जा केल्यानंतर सू यांना अटक करण्यात आली होती. म्यानमारच्या अपदस्थ नेत्या आंग सान सू या देशातील स्वतंत्रता नायक जनरल आंग सान यांची मुलगी आहे. त्यांची १९४७ मध्ये हत्या करण्यात आली होती.

सू १९६० मध्ये आपल्या आईसोबत नवी दिल्लीमध्ये आल्या होत्या. त्यांच्या आईला भारताच्या राजदुतांकडून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी आपलं आयुष्य संयुक्त राज्य आणि इंग्लंडमध्ये घालवलं. १९७२ मध्ये त्यांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधल्या हिमालयन स्टडीज ब्रिटिश स्कॉलर मायकल एरिससोबत लग्न केलं. त्यांच्या राजकीय कारकीर्दीला १९८८ मध्ये सुरूवात झाली होती.

- Advertisement -

एप्रिल १९८८ – सू आपल्या आजारी आईला सांभाळण्यासाठी पुन्हा एकदा घरात आल्या होत्या. म्यानमारमध्ये लोकतंत्रचे समर्थक विनच्या २६ वर्षांच्या सैन्य शासन विरोधात प्रदर्शनाची सुरूवात झाली होती. ८ ऑगस्ट १९८८ मध्ये संपूर्ण देशात प्रदर्शन करण्यात आलं. सुरक्षा रक्षकांनी गोळ्या चालवल्या. ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. २६ सप्टेंबर १९८८ मध्ये सू यांचा एक विरोधी पक्ष नॅशनल ली फॉर डेमोक्रॉसीला बनवण्यासाठी मोठी मदत झाली. २० जुलै १९८९ मध्ये सू यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. हे प्रकरण पुढील १५ वर्षांपासून सुरू होतं. २७ मे १९९० मध्ये नॅशनल लीग फॉर डेमोक्रॉसीमध्ये भरघोस मतांनी त्यांचा विजय झाला. परंतु सैन्य सरकारने निवडणुकीला रदद् केलं आणि सत्ता देण्यापासून दूर ठेवलं होतं.

१४ ऑक्टोबर १९९१ मध्ये सू यांनी लोकतंत्रासाठी त्यांच्या अहिंसक संघर्षासाठी नोबल शांती पुरस्कारकडून सम्मानित करण्यात आलं होतं. २७ मार्च १९९९ मध्ये सू यांचे पती मायकल एरिस यांचा इंग्लंडमध्ये कॅन्सरमुळे निधन झालं होतं. १९९५ पासून सू यांनी त्यांच्या पतीला पाहिलं सुद्धा नव्हतं. कारण त्यांना म्यानमारचा वीजा देण्यात आला नव्हता. ३० मे २००३ मध्ये उत्तर म्यानमारच्या एका राजकीय दौऱ्यादरम्यान सू यांच्या दलावर हल्ला करण्यात आला होता. त्यामध्ये त्यांच्या अनेक समर्थकांचा मृत्यू झाला होता. ७ नोव्हेंबर २०१० मध्ये सू यांच्या पक्षाद्वारे निवडणुकांचा बहिष्कार केल्यानंतर सेना समर्थित यूनिअन सॉलिडेरिटी अँण्ड डेव्हलपमेंटने २० वर्षांमध्ये आपली निवडणूक जिंकली होती. १३ नोव्हेंबर २०१० मध्ये सू यांना १५ वर्षांच्या नजरकैदेतून सुटका करण्यात आली. ८ नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांचा पक्षाने भरघोस मतांना निवडणूक जिंकली होती.

- Advertisement -

११ डिसेंबर २०१९ रोजी सू यानी आंतररष्ट्रीय न्यायालयात प्रारंभिक कानूनी कार्यवाहीमध्ये सेनेच्या कारवाईचा बचाव करण्यात आला. १ फेब्रवारी २०२१ मध्ये संसदेचं नवीन अधिवेशन बोलावण्याच्या आधीच पक्षाचे शीर्ष आणि सहकाऱ्यांना सेनेने अटक केली होती. सू यांच्यावर अनेक आरोप लावण्यात आले होते. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. ६ डिसेंबर २०२१ रोजी एका विशेष न्यायालयात सू यांच्या विरोधात पहिली सुनावणी देण्यात आली. तसेच कोरोना व्हायरसच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यांना चार वर्षासाठी तुरूंगाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.


हेही वाचा: Aung San Suu Kyi Jailed: यामुळे नोबेल विजेत्या आंग सान सू की यांना ४ वर्षांचा तुरुंगवास


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -