घरदेश-विदेशAfghanistan Crisis: तालिबानला धक्का! पंजशीरमध्ये हल्ला करणं आलं अंगलट, ३५० दहशतवादी ठार

Afghanistan Crisis: तालिबानला धक्का! पंजशीरमध्ये हल्ला करणं आलं अंगलट, ३५० दहशतवादी ठार

Subscribe

तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेताच जुलूमशाही राजवट सुरु केली आहे. मात्र तालिबान जगासमोर शांततेच्या मार्गाने सरकार स्थापन करत असल्याचा दावा करतंय. मात्र क्रुर तालिबान्यांना अद्यापही अफगाणमधील पंजशीरवर ताबा मिळवता आलेली नाही. यासाठी तालिबान पंजशीरवर हल्ले करत आहे. तर पंजशीरवर सत्ता मिळण्यासाठी तालिबान घुसखोरी करत हरतऱ्हेचे प्रयत्न करतयं. अशातचं तालिबानी दहशतवाद्यांनी काल रात्री देखील पंजशीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. अशी माहिती पंजशीरचं संरक्षण करणाऱ्या नॉर्दर्न अलायन्सनं दिली आहे.

पंजशीरमध्ये काल रात्री घुसखोरी करणाऱ्या जवळपास ३५० तालिबानी दहशतवाद्यांनी ठार करत ४० पेक्षा अधिक दहशतवाद्यांनी कैदी बनवण्यात आले. अशी माहिती नॉर्दर्न अलायन्सने दिली आहे. या कारवाईदरम्यान नॉर्दर्न अलायन्सच्या हाती अमेरिकन वाहनं आणि हत्यारे लागली आहेत. मंगळवारी रात्रीदेखील तालिबानी दहशतवाद्यांनी पंजशीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नॉर्दर्न अलायन्सनं त्यांनी चोख प्रत्युत्तर देत ठार केले.

- Advertisement -

पंजशीरमधील स्थानिक पत्रकार नातिक मालिकजादा यांच्या माहितीनुसार, पंजशीरमध्ये प्रवेश करताना लागणाऱ्या गुलबहार प्रातांत तालिबानी दहशतवादी आणि नॉर्दर्न अलायन्समध्ये युद्ध संघर्ष निर्माण झाला. या संघर्षात तालिबान्यांनी या भागातील एक पूल स्फोटकांनी उडवून टाकला. हा पूल गुलबहार आणि पंजशीर प्रातांला जोडणार होता. याशिवाय अनेक तालिबानी दहशतवाद्यांना पकडून कैदी करण्यात आले.

सोमवारी रात्री तालिबानी दहशतवादी आणि नॉर्दर्न अलायन्सच्या योद्धांमध्ये जोरदार चकमक झाली. दोन्ही बाजूंनी बेछूट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात ७ ते ८ तालिबानी ठार झाले. मात्र तरीही पंजशीर काबीज करण्यासाठी तालिबान प्रयत्न करतयं. मात्र अहमद मसूद यांच्या नेतृत्त्वाखाली नॉर्दर्न अलायन्स अतिशय चतुराई आणि धीराने तालिबानी संकटाशी सामना करत आहे.

- Advertisement -

“हे तर गुंडा राज, काय करतय सरकार?” कल्पिता पिंपळे हल्ल्याप्रकरणी चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -