घरताज्या घडामोडीCorona Vaccination: आता गुगलवर सर्च करून बूक करा लसीचे स्लॉट

Corona Vaccination: आता गुगलवर सर्च करून बूक करा लसीचे स्लॉट

Subscribe

कोरोना व्हायरसविरोधात देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यात येण्यासाठी देशात वेगाने लसीकरण मोहीम सुरू आहे. आता लसीकरणासाठी स्लॉट बूक करण्याची पद्धत आणखीन सोप्पी करत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक महत्त्वाची सेवा जारी केली आहे. आता गुगलच्या माध्यमातून लसीकरणासाठी स्लॉट बूक करणे शक्य होणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी बुधवारी एक ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.

आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया म्हणाले की, ‘केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना लस लोकांपर्यंत अजून सोप्पा पद्धतीने पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता गुगलवर ‘कोविड वॅक्सीन नेअर मी’ (covid vaccine near me) असे सर्च करा. त्यानंतर स्लॉट्स उपलब्ध आहे की नाही ते चेक करा (Check availability of slots & more). मग बुक माय अपॉइंटमेंट फीचर वापरून (Use ‘Book Appointment’ feature to book a slot) लसीकरणासाठी स्लॉट बूक करा.’

- Advertisement -

देशात आतापर्यंत ६५ कोटी ९१ लाख ८ हजारांहून अधिक जणांचा लसीकरण पार पडले आहे. यापैकी ५० कोटी ७७ लाखांहून अधिक जणांनी लसीचा पहिला डोस घेतला असून १५ कोटी १३ लाखांहून अधिक जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत ४१ हजार ९६५ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ४६० जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. तर ३३ हजार ९६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी २८ लाख १० हजार ८४५ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ३९ हजार २० जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी १९ लाख ९३ हजार ६४४ कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ३ लाख ७८ हजार १८१ जणांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोना महामारीत लोकांचा LIC वरील विश्वास वाढला; ५ महिन्यात १५ हजारांहून अधिक पॉलिसी वाढल्या


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -